सिबीएससीकडून त्रिभाषा धोरणात बदल; दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा रद्द
नवी दिल्ली , 29 जून (हिं.स.)। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सिबीएससी) त्रिभाषा धोरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंडळाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सध्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्या
सिबीएससीकडून त्रिभाषा धोरणात बदल; दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा रद्द


नवी दिल्ली , 29 जून (हिं.स.)। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सिबीएससी) त्रिभाषा धोरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंडळाने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सध्या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. या निर्णयामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्याच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांवर नवे त्रिभाषा धोरण लागू होणार नाही. सध्या इयत्ता ७ वी, ८ वी आणि ९ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पुढे दहावीत तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आधीच दोन परदेशी भाषा निवडल्या आहेत, त्यांना त्या पुढेही शिकता येतील.मात्र अशा विद्यार्थ्यांना त्यासोबत एक भारतीय मातृभाषा/भारतीय भाषा शिकणे अनिवार्य असेल.प्रत्येक इयत्तेनुसार आवश्यक अभ्यास साहित्य (स्टडी मटेरियल) वेळेत उपलब्ध करून दिले जाईल. भाषा शिकण्याची प्रक्रिया अधिक रंजक, उपयुक्त आणि ज्ञानवर्धक बनवण्यावर भर दिला जाणार असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जाईल.

राष्ट्रीय शिक्षण धोरण-2020 (NEP-2020) नुसार विद्यार्थ्यांनी तीन भाषा शिकणे अपेक्षित आहे. त्यापैकी किमान दोन भाषा भारतीय असणे आवश्यक किंवा शिफारसीय आहे. सिबीएससी चा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना विविध भारतीय भाषांमध्ये प्रावीण्य मिळवून देणे आणि भाषा शिक्षणाला चालना देणे हा आहे, जेणेकरून त्यांचे शिक्षण अधिक संतुलित आणि सर्वांगीण होईल. मंडळाच्या मते, भाषा शिकणे हा केवळ अभ्यासक्रमाचा भाग न राहता विद्यार्थ्यांसाठी अर्थपूर्ण, आनंददायी आणि ज्ञानवर्धक अनुभव ठरावा.

माध्यमिक स्तरावरील इयत्ता ९ वी आणि १० वीमध्ये तिसऱ्या भाषेचा (R3) समावेश हा इयत्ता ६ वी ते ८ वीमध्ये सुरू झालेल्या भाषा शिक्षणाच्या प्रक्रियेचा विस्तार आहे. याच उद्देशाने शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून सिबीएससी संलग्न शाळांमध्ये त्रिभाषा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande