भारत-पाकिस्तान ट्रॅक-२ संवादाशी सरकारचा कोणताही संबंध नाही- परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री
नवी दिल्ली , 29 जून (हिं.स.)।परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सोमवारी स्पष्ट केले की, भारत-पाकिस्तान संबंधांवर परदेशात आयोजित करण्यात येणाऱ्या ट्रॅक-२ संवादांशी भारत सरकारचा कोणताही संबंध नाही. अशा चर्चांमध्ये सहभागी होणारे निवृत्त राजनयिक, लष्कर
भारत-पाकिस्तान ट्रॅक-२ संवादाशी सरकारचा कोणताही संबंध नाही- परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री


नवी दिल्ली , 29 जून (हिं.स.)।परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सोमवारी स्पष्ट केले की, भारत-पाकिस्तान संबंधांवर परदेशात आयोजित करण्यात येणाऱ्या ट्रॅक-२ संवादांशी भारत सरकारचा कोणताही संबंध नाही. अशा चर्चांमध्ये सहभागी होणारे निवृत्त राजनयिक, लष्करी अधिकारी किंवा इतर व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक क्षमतेत सहभागी होतात, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सरकार अशा कार्यक्रमांची दखलही घेत नाही.

सेशेल्सची राजधानी व्हिक्टोरिया येथे माध्यमांशी संवाद साधताना मिस्री यांनी हे वक्तव्य केले. गेल्या आठवड्यात कोलंबोमध्ये आयोजित प्रादेशिक सुरक्षा परिषदेदरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील तज्ज्ञांनी ट्रॅक-२ चर्चेत भाग घेतल्याच्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.या चर्चेत निवृत्त लष्करी अधिकारी, माजी राजनयिक आणि काही राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचे वृत्त होते. मिस्री म्हणाले, “जगभरात विविध विषयांवर अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. त्यात काहीही नवीन किंवा विशेष नाही.” ते पुढे म्हणाले, “आमच्या दृष्टीने हे खाजगी व्यक्तींनी आयोजित केलेले खाजगी कार्यक्रम आहेत. त्यामध्ये कोणताही अधिकृत सहभाग नाही.”

एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले, “मी पाकिस्तान सरकारच्या वतीने बोलू शकत नाही. मात्र भारत सरकारच्या वतीने एवढे स्पष्ट सांगू शकतो की, अशा कार्यक्रमांमध्ये सरकारचा कोणताही अधिकृत सहभाग, पाठिंबा किंवा संबंध नाही.” मिस्री म्हणाले, “अशा कार्यक्रमांमध्ये भारतातून सहभागी होणारे निवृत्त राजनयिक, निवृत्त लष्करी अधिकारी किंवा नागरी समाजातील प्रतिनिधी हे त्यांच्या वैयक्तिक भूमिकेतून बोलतात आणि केवळ स्वतःचे मत मांडतात.”

ते पुढे म्हणाले की, अशा व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत भारत सरकारची अधिकृत भूमिका मांडू शकत नाहीत किंवा सरकारचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांकडे वैयक्तिक मत म्हणूनच पाहिले पाहिजे. शेवटी त्यांनी पुन्हा स्पष्ट केले की, “भारत सरकार अशा कार्यक्रमांची कोणतीही अधिकृत दखल घेत नाही. आमच्या दृष्टीने त्यांना कोणतेही विशेष महत्त्व नाही.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande