भास आणि सत्य यांमधील अंतर दाखवणाऱ्या 'दृश्य-अदृश्य' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
मुंबई, 03 जून (हिं.स.)। जागतिक पातळीवरील सिनेरसिकांच्या मनात रहस्यपटांचे एक वेगळे स्थान आहे. कित्येकदा समाजात घडणाऱ्या काही हृदयस्पर्शी घटनाच सिनेमाचे रूप घेऊन रुपेरी पडद्यावर दाखवल्या जातात, पण त्यातील रहस्य कायम रसिकांची उत्सुकता वाढवत राहते. मरा
भास आणि सत्य यांमधील अंतर दाखवणाऱ्या 'दृश्य-अदृश्य' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित...


मुंबई, 03 जून (हिं.स.)। जागतिक पातळीवरील सिनेरसिकांच्या मनात रहस्यपटांचे एक वेगळे स्थान आहे. कित्येकदा समाजात घडणाऱ्या काही हृदयस्पर्शी घटनाच सिनेमाचे रूप घेऊन रुपेरी पडद्यावर दाखवल्या जातात, पण त्यातील रहस्य कायम रसिकांची उत्सुकता वाढवत राहते. मराठी चित्रपटसृष्टीला अशा रहस्यपटांची फार मोठी परंपरा लाभली आहे. 'दृश्य-अदृश्य' हा चित्रपट याच वाटेवरील अतिशय महत्त्वाचा चित्रपट ठरणार आहे. ५६व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव म्हणजेच 'इफ्फी'मध्ये कौतुकाची थाप मिळवणारा 'दृश्य-अदृश्य' हा चित्रपट १९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'सुभेदार', 'शेर शिवराय' आणि 'सापळा' चित्रपटांच्या निर्मात्यांची भेट असलेल्या 'दृश्य-अदृश्य' या रहस्यमय चित्रपटाचा रोमांचक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

निर्माते प्रद्योत पेंढारकर, अनिल वर्खडे, दत्ताजी थोरात, धनंजय थोरात, पृथ्वीराज खेडकर, युवराज खेडकर आणि अश्विनी खेडकर यांनी आरएसटी कॅनव्हास या बॅनरखाली ‘दृश्य-अदृश्य’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘कुरुक्षेत्र', ‘बंदीशाळा' , ‘एबी आणि सीडी' या यशस्वी चित्रपटानंतर मिलिंद लेले यांनी 'दृश्य-अदृश्य'चे दिग्दर्शन केले असून, कथा-पटकथा लेखनही केले आहे. अस्मिता कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला चित्रपटाच्या कथेतील रोहितला २५ लाख रुपये इन्सेन्टिव्ह मिळणार असल्याचे पाहायला मिळते. हा इन्सेन्सटीव्ह त्याला कशासाठी मिळणार असते याचे गुपित त्याची पत्नी तन्वी हिलाही माहित नसते. अशातच रोहित आणि तन्वी यांची लहान मुलगी इशा हरवते. तिला शोधण्यासाठी पोलिसांची एन्ट्री होते, पण तन्वी हॅाटेलमध्ये एकटीच आली असल्याचे हॅाटेलमधील लोकांचे म्हणणे असते. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे, प्रत्येकाच्या जबानीमधील तफावत, इशाचा शोध आणि पोलिसांच्या तपासाच्या फेऱ्यात अडकलेल्या या चित्रपटात 'दृश्य-अदृश्य' यांचा रहस्यमय खेळ पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलर पाहिल्यावर जाणवते. अशातच तन्वीच्या पतीचा मृतदेह सापडतो आणि कथानकातील गुंता सुटण्याऐवजी अधिकच वाढतो. तन्वीने सांगितलेली गोष्ट खरोखरंच घडली आहे का? नेमकं कोण खोटं बोलतंय? कोण कोणाशी खेळ खेळतंय? इशाला नेमके कोणी पळवले का ती न्हवतीच? रोहितची हत्या कोणी केली? हे प्रश्न उभे राहतात. भास आणि सत्य यांमध्ये असलेले अंतर म्हणजे 'दृश्य-अदृश्य' हा चित्रपट आहे. जे दिसतं तेच खरं असतं का... दृश्यामागचं अदृश्य सत्य... ही ट्रेलरमधील कॅप्शन उत्सुकता शिगेला पोहोचवणारी आहेत.

मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत लोकप्रिय झालेली पूजा सावंत या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमधील पूजाच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि एकूणच परिस्थिती उत्सुकता वाढवणारी आहे. पूजाने साकारलेली तन्वी आजवरच्या तिच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. तिच्यासोबत अशोक समर्थ, सुव्रत जोशी, हार्दिक जोशी, अक्षया गुरव, विद्याधर जोशी, केया इंगळे आदी मराठीतील आघाडीचे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. डिओपी अमोल साळुंके यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन सचिन वाघ यांनी केले आहे. रंगभूषा महेश बराटे यांनी, तर वेशभूषा किर्ती जंगम-जोशी यांनी केली आहे. गीतकार वलय मुळगुंद यांनी लिहिलेल्या गीतरचनांना संगीतकार आशिष मुजुमदार, देवदत्त बाजी यांनी संगीतसाज चढवला आहे. गायिका प्रियांका बर्वे आणि निधी हेगडे यांच्या आवाजातील गाणी कथानकाला गती प्रदान करणार आहेत. या गाण्यांवर दीपक देबनाथ यांनी नृत्य दिग्दर्शन केले असून, कला दिग्दर्शन नितिन बोरकर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande