करूर दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री विजय यांचा १० व ११ जुलैला पहिलाच दौरा; पीडित कुटुंबीयांची घेणार भेट
चेन्नई , 30 जून (हिं.स.)। तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय १० आणि ११ जुलै रोजी करूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गेल्या वर्षी टीआरकेच्या जाहीर सभेदरम्यान झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्
करूर दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री विजय यांचा १० व ११ जुलैला पहिलाच दौरा; पीडित कुटुंबीयांची घेणार भेट


चेन्नई , 30 जून (हिं.स.)। तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय १० आणि ११ जुलै रोजी करूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गेल्या वर्षी टीआरकेच्या जाहीर सभेदरम्यान झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री विजय यांचा हा पहिलाच करूर दौरा असणार आहे. या दौऱ्यात ते मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करणार आहेत. राजकीय तसेच मानवी दृष्टिकोनातून हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

पक्ष आणि सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री विजय आपल्या दोन दिवसीय करूर दौऱ्यात दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेणार आहेत. दुर्घटनेनंतर सुरक्षा कारणास्तव आणि पोलिसांनी घातलेल्या निर्बंधांमुळे त्यांना करूरला जाता आले नव्हते. त्यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीडित कुटुंबीयांशी संवाद साधून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांनी महाबलीपुरम येथेही पीडित कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली होती.

चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला मुख्यमंत्री विजय यांनी २० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली होती. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. तसेच दीर्घकालीन मदत देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले होते. करूर दौऱ्यात ते पीडित कुटुंबीयांच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन अतिरिक्त मदतीबाबतही निर्णय घेऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री विजय यांचा करूर दौरा केवळ शोकसंवेदना व्यक्त करण्यापुरता मर्यादित राहणार नाही. ते जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहतील तसेच अनेक कल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटनही करतील.राजकीय विश्लेषकांच्या मते, हा दौरा राज्यव्यापी जनसंपर्क मोहिमेची सुरुवात मानला जात आहे. या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री राज्यातील इतर जिल्ह्यांचाही दौरा करणार असल्याची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असून विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतील. तसेच नागरिकांशी थेट संवाद साधतील. याशिवाय विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल ते आभार व्यक्त करतील आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचीही समीक्षा करतील. प्रशासन अधिक सक्षम करणे आणि नागरिकांशी थेट संवाद कायम ठेवणे, हा सरकारचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात

आहे.

गेल्या वर्षी २७ सप्टेंबर रोजी करूर येथे टीआरकेच्या सार्वजनिक सभेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. तसेच राजकीय सभांमधील गर्दीचे व्यवस्थापन आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून सुरू असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे देखरेख आहे. त्यामुळे मुख्यमंत्री विजय यांचा हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande