
बीड, 05 जून (हिं.स.)। राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी शहरातील जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्यांचा जागेवर निपटारा केला.
विविध ठिकाणी भेटी घेतल्यानंतर त्यांनी प्रशांतनगर भागात नव्यानेच सुरू केलेल्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार घेतला. त्यांना भेटून समस्या मांडण्यासाठी सर्व सामान्य नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. आलेल्या प्रत्येकांना भेटत, त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेत त्यांच्या कामाचे पत्र असतील, फोन असतील किंवा वैयक्तिक काम असेल ते त्यांनी जागेवरच सोडविले.
कामे घेऊन येणारांची दरवेळेस होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन ना. पंकजाताईंनी भेटीचे शिस्तबद्ध नियोजन केले . प्रचंड गर्दीमुळे नियोजन कोलमडते, हा अनुभव पाहून आलेल्या प्रत्येकाचे काम मार्गी लागले जावे, त्यांचे प्रश्न ऐकले जावेत यासाठी अंबाजोगाईत जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे.परळी मतदारसंघाचा काही भाग अंबाजोगाई तालुक्यात येत असल्याने आणि केज तालुकासुध्दा जवळ असल्याने दोन्ही भागातील जनतेची सोय याठिकाणी झाली आहे. पंकजाताईंच्या जनता दरबार संकल्पनेचे नागरिकांनी स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.
------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis