बीड - मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेला भेट
बीड, 05 जून (हिं.स.)। अंबाजोगाईकडे जाताना रस्त्यात वरवटी येथे ॲड अशोक मुंडे यांच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेला भेट देऊन मंत्री पंकजा मुंडे यांनी येथील विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून तयार करण्यात आल
बीड - मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेला भेट


बीड, 05 जून (हिं.स.)। अंबाजोगाईकडे जाताना रस्त्यात वरवटी येथे ॲड अशोक मुंडे यांच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोरक्षण शाळेला भेट देऊन मंत्री पंकजा मुंडे यांनी येथील विविध उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांची पाहणी करून कौतुक केले. आधुनिक पध्दतीच्या गोकाष्ठ सयंत्राचे उदघाटन त्यांनी याप्रसंगी केले.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली.भाजपचे प्रदेश प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांच्या निवासस्थानी देखील ना.पंकजाताईंनी भेट दिली. रामभाऊ यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहू शकल्या नसल्याने दौऱ्यात त्यांच्या घरी जावून नवदामप्त्यांना शुभाशीर्वाद दिले.

दोडतले, भंसाळी परिवाराचे केले सांत्वन

शेळी मेंढी विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष बालासाहेब दोडतले यांच्या मातोश्री कमलबाई तसेच पुरूषोत्तम भन्साळी यांच्या मातोश्री शकुंतलाबाई यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. शहरात आल्यानंतर या दोन्ही परिवाराच्या घरी जाऊन ना. पंकजाताईंनी त्यांचे सांत्वन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande