मध्यवर्ती कारागृह येथील तोफ गाडयांना ठाणे जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठानने दिले नवीन रूप
ठाणे, 05 जून (हिं.स.)। सह्याद्री प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष गड संवर्धनाचे काम करत असून गडाचे पावित्र्य आणि त्याच बरोबर संवर्धन करत गडांची डागडुजी, बुरुज दुरुस्ती, महादरवाजे,तोफ गाडे, स्वच्छता, जनजागृती करत असून या मोहिमे मध्ये हजारो दुर्गसेवक तन मन
Thane


ठाणे, 05 जून (हिं.स.)। सह्याद्री प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष गड संवर्धनाचे काम करत असून गडाचे पावित्र्य आणि त्याच बरोबर संवर्धन करत गडांची डागडुजी, बुरुज दुरुस्ती, महादरवाजे,तोफ गाडे, स्वच्छता, जनजागृती करत असून या मोहिमे मध्ये हजारो दुर्गसेवक तन मन धन लावून काम करत आहेत. दुर्गसेवकांचे गडावर तसेच तेथील वास्तुवर लक्ष ठेऊन तेथील वेळोवेळी गड किल्ल्याना नवसंजीवनी देण्याचे काम करत आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे पडक्या स्वरूपात असलेल्या असलेल्या तोफाना सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर व संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तोफगाडे बनवून काही वर्षांपूर्वी नवसंजीवनी देण्यात आली. यांच्या संवर्धना करिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर विभाग यांनी परवानगी मागितली असता कारागृह अधिक्षक राणी भोसले यांनी तत्काळ परवानगी दिली.

ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे असलेले तोफ गाडे सुव्यवस्थित राहण्या करिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर दुर्गसेवकांच्या वतीने तोफ गाडयांना स्वच्छ करून त्याचे पावसाच्या पाण्यापासून त्यांचे झिज होऊ नये खराब होऊ नयेत याकरिता शाकारनी करण्यात आली. सदर मोहिमेत तोफांना निळ्या, चंदेरी तैलीय रंगाने तर तोफगाड्यांना जलरोधक राखाडी रंगाने रंगवन्यात आले. दरवर्षी या पद्धतीने या तोफगाडयांना शाकारणी करण्यात येते असे दुर्गसेवक व सहयाद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर यांनी सांगितले. यावेळी संगीता जाधव, संजय सडजी, भावेश शार्दुल, साई जाधव दुर्गंसेवक यांच्या प्रयत्नाने तोफा व तोफगाडयांना नवसंजीवनी देण्यात आली. यावेळी ठाणे मध्यवर्ती करागृह उप अधीक्षक श्री. भवर हे उपस्थित होते. तर आमदार संजय केळकर यांनी व्हिडीओ call च्या माध्यमातून दुर्गसेवकांचे कौतुक केले.

गेली अनेक वर्ष सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे दुर्गसेवक गड किल्ल्याचे संवर्धन करत असून कामातून वेळ काढून गडावरील तोफ, तोफगाडे, बुरुज, महादरवाजे संवर्धनाचे काम, स्वच्छता करत असून गडांवरील जुनी ऐतिहासिक पुरातन मंदिरे पुन्हा जीर्णोद्धार करण्याचे काम प्रतिष्ठानच्या माध्यमातून होतं असल्याची माहिती आ. केळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande