अजित पवार अपघाती निधन - अंतिम रिपोर्ट जानेवारीपूर्वी अपेक्षित, नंतरच तपासाला दिशा मिळेल - मुख्यमंत्री
मुंबई, 10 जुलै (हिं.स.) - पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत नेते अजित पवार यांचा अपघाती मृत्यू आणि त्याच्या तपासाविषयी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अजित प
मुख्यमंत्री फडणवीस विधानसभा


मुंबई, 10 जुलै (हिं.स.) - पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत नेते अजित पवार यांचा अपघाती मृत्यू आणि त्याच्या तपासाविषयी माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या संदर्भात दोन प्रकारे तपास सुरु आहे, सीआयडी व एएआयबी तपास करत आहे. जेवढे डाऊनलोड करायचे ते डॉक्युमेंट डाऊनलोड झाले आहे. ब्लॅक बॉक्स मधील सर्व माहिती घेतली आहे. एक प्रिमिलरी रिपोर्ट आला आहे, मात्र सगळा अंतिम रिपोर्ट हा जानेवारीपूर्वी येईल. हा अहवाल आल्यानंतरच सीबीआयच्या तपासाला दिशा मिळणार आहे. त्यामुळे या अहवालाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. तसे अहवालासाठी तीन ते चार वर्षे लागतात, हे खरे आहे. पण केंद्र सरकारने विनंती केली आहे, म्हणून दादांच्या पुण्यतिथी आधी हा रिपोर्ट यावा. या रिपोर्टनंतर सीबीआय किंवा सीआयडी यांना धागेदोरे मिळतील. सीआयडी तपासानुसार पायलट सुमित कपूर यांच्यावर शंका होती, त्यांचे सर्व बँक खाते तपासले, पण त्याच संशयास्पद आढळले नाही.

फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, ‘कुणी शंका घ्यायची गरज नाही, कर्नाटकमध्ये एफआयआर केला. पहिले दोषी कोण हे ठरवावे लागेल. एएआयबीचा रिपोर्ट आल्याशिवाय ते करता येत नाही. भावना महत्त्वाची आहे, पण कायदा भावनेने चालत नाही. कोर्टात ते टिकणार नाही, चपराक बसेल. त्यामुळे रिपोर्ट येईपर्यंत आम्ही वाट पाहत आहोत.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला सहा महिने झाले मात्र प्रकरणाचा तपास नेमका कुठपर्यंत आला? याबाबत सर्वांना प्रतिक्षा आहे. अजित पवारांचा अपघात नेमका कसा झाला? हे जाणून घेण्यासाठी एएआयबीच्या रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवारांच्या अपघात प्रकरणात एएआयबीचा रिपोर्ट हा महत्त्वाचा आहे. या संदर्भात मी माहिती घेतली आहे. आतापर्यंत विमानाचा ब्लॅक बॉक्स असेल किंवा दुसरा जो काय बॉक्स आहे ते सगळं झालेलं आहे. आज केंद्र सरकारशी देखील चर्चा केली आणि केंद्र सरकारला, गृह मंत्रालयाला आणि मंत्री महोदयांना मी विचारलं की, साधारण हा सगळा रिपोर्ट किती दिवसात अपेक्षित आहे? त्यांनी मला हे सांगितलं की, साधारणपणे जानेवारीपूर्वी हा रिपोर्ट येईल. अंतिम रिपोर्ट जो आहे, आणि हाच रिपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande