टीसीएस प्रकरणातील निदा खानला डिलिव्हरीमुळे न्यायालयाने दिला जामीन, खाजगी रुग्णालयात दाखल ?
Court grants bail to Nida Khan in TCS case due to delivery, admitted to private hospital?
Court grants bail to Nida


नाशिक, 10 जुलै (हिं.स.)।

- नाशिकमधील टीसीएस प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजले असून या प्रकरणाने संपूर्ण देशात एकच खळबळ निर्माण केली आहे. दरम्यान या प्रकरणात अनेक नवनवीन खुलासे समोर आले असून या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला पोलिसांनी अटक केली. पण निदा खान गर्भवती असल्याने कोर्टाने तिला जामीन मंजूर केला. कोर्टाचा हा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक होता. पण तिची जामीन अर्ज स्वीकारताना स्थानिक कोर्टाने म्हटले की, तुरुंगात मुलाला जन्म देण्याची वेदना कोणत्याही महिलेसाठी असह्य असते.

समोर आलेल्या माहितीनुसार, कोर्टाने या संदर्भात भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उल्लेखही केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश (नाशिक रोड) के. जी. जोशी यांनी म्हटले की, टीसीएस प्रकरणातील चौकशीत प्रथमदर्शनी असे दिसते की, निदा खानने इतर सहआरोपींसोबत मिळून पीडितेला मानसिकदृष्ट्या प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. तिची विचारसरणी आणि धर्म बदलण्याचा प्रयत्न केला.

लैंगिक छळ आणि धर्मांतरणाशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीचा उल्लेख करताना न्यायाधीश म्हणाले की, आरोपींनी पीडितेला हिंदू धर्म ठीक नाही असे म्हणत तिचा विश्वास संपादन केला. सुमारे दोन महिन्यापूर्वी अटक झालेल्या निदा खानला ६ जुलै रोजी कोर्टाने जामीन दिला होता. या संबंधातील विस्तृत आदेश गुरुवारी उपलब्ध झाला. न्यायाधीशांनी आदेशात म्हटले की, एफआयआरमध्ये खान यांची भूमिका स्पष्टपणे उल्लेखित आहे.

दरम्यान, निदा पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात घेऊन कोर्टाने तिचा जामीन अर्ज स्वीकारला आहे. न्यायाधीश म्हणाले, आरोपी गर्भवती आहे. याशिवाय या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे आणि चार्जशीटही दाखल झाली आहे. अशा परिस्थितीत तिला न्यायिक हवालात ठेवण्याचे कोणतेही औचित्य नाही.

नाशिकमधील घटनेनंतर निदा खान अटकेच्या भीतीने फरार झाली होती. या काळात तिने पोलिसांना चकवा देण्यासाठी सातत्याने आपली ठिकाणे बदलत राहिली. यानंतर तपासातून काही महत्त्वाची माहिती समोर आली. त्यानुसार, निदा खानने सर्वात आधी ठाणे गाठले, त्यानंतर काही दिवस तिने भिवंडीत आश्रय घेतला. यानंतर तिने मुंबई आणि सोलापूरमधील आपल्या नातेवाईकांकडे मुक्काम ठोकला. निदा खानने मालेगावमध्ये स्थानिक स्तरावर मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. पण तिथे तिचे प्रयत्न अपयशी ठरले. आता तिला या प्रकरणात जामीन मंजुर झाला आहे.

दरम्यान या प्रकरणांमध्ये जेलमधून सुटल्यानंतर निदा खान वारेग्रस्त टीसीएस कंपनी शेजारी असलेल्या अशोका मेडिकलवर या रुग्णालयामध्ये दाखल झाल्याचे प्रथमदर्शनी माहिती उपलब्ध होत असून याबाबत अशोका रुग्णालयाच्या प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला असून निदा खान तिच्या भेटीची परवानगी देखील त्यांनी दिलेली नाही त्यामुळे निदा खान निश्चित कोणत्या कारणामुळे रुग्णालयात दाखल आहे हे कळू शकले नाही

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande