डॉक्टरांना मारहाण प्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रेसह चौघांना १३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी
डोंबिवली, 10 जुलै (हिं.स.)। कल्याण डोंबिवली महानगर पालिका अंतर्गत असणाऱ्या शास्त्रीनगर हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या घटनेमधील मुख्य आरोपी शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे सह रमेश पवार, प्रकाश निकम आणि अक्षय कारंडे या चौघांना कल्
Ph01


डोंबिवली, 10 जुलै (हिं.स.)। कल्याण डोंबिवली महानगर पालिका अंतर्गत असणाऱ्या शास्त्रीनगर हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या घटनेमधील मुख्य आरोपी शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे सह रमेश पवार, प्रकाश निकम आणि अक्षय कारंडे या चौघांना कल्याण न्यायालयाने सोमवार १३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास म्हात्रे याला पोलिसांनी कोर्टात हजर केले होते.

यापूर्वी म्हणजे गुरुवारी डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार रमेश म्हात्रे यांची प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत पोलिसांनी कोर्टापुढे विनंती अर्ज केला होती की, पोलिस कोठडी देण्याविषयीची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्यावी. मात्र न्यायाधीश के. एस. कातकडे यांनी आरोपीला प्रत्यक्ष हजर करा त्यानंतरच निर्णय असे सांगून पोलिसांचा विनंती अर्ज फेटाळला होता. त्यानुसार आज शुक्रवारी पोलिसांनी डॉक्टरांचा अहवाल मिळाल्यानंतर रमेश म्हात्रेला कोर्टात सुनावणीसाठी हजर केले होते.

यानंतर रमेश म्हात्रे यांच्या वकिलांनी याविषयी दिलेल्या माहितीनुसार रमेश म्हात्रे यांचे वय आणि त्याची प्रकृतीचा विचार करून त्यांची दर ६ तासाने वैद्यकीय चाचणी करावी आणि जर रक्तदाबाचा आजार वाढला तर वैद्यकीय उपचार करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande