अधिक अल्कोहोलयुक्त औषधांवर सरकारचा बडगा; आता परवाना आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्रीला बंदी
नवी दिल्ली, 10 जुलै (हिं.स.)। बाजारात उपलब्ध असलेल्या अधिक अल्कोहोलयुक्त औषधांच्या विक्रीवर केंद्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. आता 12 टक्क्यांपेक्षा अधिक इथाइल अल्कोहोल असलेली आणि 30 मिलीपेक्षा जास्त प्रमाणातील औषधे परवाना तसेच डॉक्टरांच्या
High alcohal drugs rules amend


नवी दिल्ली, 10 जुलै (हिं.स.)। बाजारात उपलब्ध असलेल्या अधिक अल्कोहोलयुक्त औषधांच्या विक्रीवर केंद्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. आता 12 टक्क्यांपेक्षा अधिक इथाइल अल्कोहोल असलेली आणि 30 मिलीपेक्षा जास्त प्रमाणातील औषधे परवाना तसेच डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकता येणार नाहीत.

केंद्र सरकारने ड्रग्स रूल्स, 1945 मध्ये सुधारणा करत या औषधांच्या निर्मिती आणि वितरणासाठी नियम अधिक कठोर केले आहेत. यापुढे अशा औषधांना पूर्वीप्रमाणे शेड्यूलमधील सूट मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्या उत्पादनासाठी आणि विक्रीसाठी संबंधित परवाना घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.सरकारने या औषधांचा समावेश शेड्यूल एच 1 मध्ये केला आहे. त्यामुळे ही औषधे आता केवळ नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरच उपलब्ध होतील. तसेच औषध विक्रेत्यांना या औषधांच्या विक्रीची संपूर्ण नोंद ठेवावी लागणार आहे.

या निर्णयामागचा मुख्य उद्देश अशा औषधांचा होणारा गैरवापर रोखणे आणि सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करणे हा आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, वेलची, आले आणि इतर सुगंधी टिंचर यांसारख्या काही औषधी उत्पादनांमध्ये 80 ते 90 टक्क्यांपर्यंत इथाइल अल्कोहोल असते. काही ठिकाणी या उत्पादनांचा औषधांऐवजी नशेसाठी वापर होत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या.मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, नवीन नियमांमुळे अशा औषधांची विक्री केवळ अधिकृत औषध पुरवठा व्यवस्थेद्वारेच होईल. त्यामुळे गैरवापरावर नियंत्रण ठेवता येईल, तसेच गरज असलेल्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही औषधे उपलब्ध होत राहतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande