ऑस्ट्रेलियन माध्यमांत पंतप्रधान मोदींची चर्चा; एका वृत्तपत्राने दिली ‘मिस्टर इंडिया’ची उपाधी
नवी दिल्ली , 10 जुलै (हिं.स.)।ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक दौऱ्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथील माध्यमांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. ऑस्ट्रेलियातील प्रमुख वृत्तपत्रांनी त्यांच्या दौऱ्याला आणि पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासोबत
ऑस्ट्रेलियन माध्यमांत पंतप्रधान मोदींची चर्चा; एका वृत्तपत्राने दिली ‘मिस्टर इंडिया’ची उपाधी


नवी दिल्ली , 10 जुलै (हिं.स.)।ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक दौऱ्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथील माध्यमांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरले. ऑस्ट्रेलियातील प्रमुख वृत्तपत्रांनी त्यांच्या दौऱ्याला आणि पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासोबत झालेल्या चर्चेला प्रमुख स्थान दिले. एका नामांकित वृत्तपत्राच्या स्तंभलेखात तर पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख ‘मिस्टर इंडिया’ असा करण्यात आला.

वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियन माध्यमांनी पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याला भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून वर्णन केले आहे. व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि गुंतवणूक यांसारख्या अनेक क्षेत्रांत दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण करार झाले असून त्यांची व्यापक चर्चा वृत्तपत्रांमध्ये पाहायला मिळाली.ऑस्ट्रेलियातील प्रमुख वृत्तपत्र द ऑस्ट्रेलियन ने आपल्या पहिल्या पानावर पंतप्रधान मोदींचा फोटो प्रकाशित करत “Modi comes bearing gifts on trade, defence” (मोदी व्यापार आणि संरक्षण क्षेत्रासाठी नवी संधी घेऊन आले आहेत) अशी मथळी दिली. याच वृत्तपत्रातील एका स्तंभात “PM’s all the way with Mr India” या शीर्षकाखाली लेख प्रसिद्ध करण्यात आला असून त्यात पंतप्रधान मोदींना ‘मिस्टर इंडिया’ असे संबोधण्यात आले आहे. तर दुसऱ्या प्रमुख वृत्तपत्रने देखील आपल्या पहिल्या पानावर मोदींच्या दौऱ्याला स्थान देत “Albanese’s Modi Operandi” अशी ठळक मथळी दिली.

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलियाने युरेनियम निर्यात, नवीकरणीय ऊर्जा, महत्त्वपूर्ण खनिजे आणि हरित हायड्रोजन यांसारख्या रणनीतिक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याची घोषणा केली.

यामधील सर्वात महत्त्वाचा करार म्हणजे ऑस्ट्रेलियाकडून भारताला शांततापूर्ण अणुऊर्जा निर्मितीसाठी युरेनियम निर्यात करण्यास मंजुरी देण्याबाबतचा होता. या करारामुळे भारताला अणुऊर्जा क्षमता वाढविण्यास मदत होणार असून ऑस्ट्रेलियाला आपल्या नैसर्गिक संसाधनांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

करारानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज म्हणाले, “ऑस्ट्रेलिया आणि भारत हे केवळ जवळचे भागीदार नाहीत, तर अतिशय चांगले मित्रही आहेत.” तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील भागीदारीमुळे ऐतिहासिक संधी निर्माण झाल्या आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियन कंपन्यांना भारतातील रस्ते, बंदरे, रेल्वे आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

दौऱ्यादरम्यान पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी नरेंद्र मोदी यांना “भारत आणि ऑस्ट्रेलियामधील जिवंत दुवा” असे संबोधले. त्यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांतील आर्थिक संबंधांना नवी दिशा मिळाली आहे.दरम्यान, मेलबर्न येथे पंतप्रधान मोदी यांनी भारतीय वंशाच्या नागरिकांच्या भव्य कार्यक्रमालाही संबोधित केले. यावेळी हजारो प्रवासी भारतीयांनी “मोदी… मोदी…” अशा घोषणांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. मेलबर्नमधील सर्व कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. तेथील दौरा पूर्ण केल्यानंतर ते भारतात परतणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande