कर्नाटक : बेळगावमध्ये संघाच्या बैठकीला प्रारंभ
बेळगाव १० जुलै (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक आज, शुख्रवारी कर्नाटकातील बेलगाव येथे सुरू झाली. ही बैठक 10,11 आणि 12 जुलै या कालावधीत पार पडणार आहे. या बैठकीस सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्
बेळगाव बैठकीत मार्गदर्शन करताना सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे


बेळगाव १० जुलै (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक आज, शुख्रवारी कर्नाटकातील बेलगाव येथे सुरू झाली. ही बैठक 10,11 आणि 12 जुलै या कालावधीत पार पडणार आहे.

या बैठकीस सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, सर्व सह सरकार्यवाह, अखिल भारतीय कार्य विभाग प्रमुख व सहप्रमुख, कार्यकारिणी सदस्य, क्षेत्र प्रचारक, सह क्षेत्र प्रचारक तसेच देशातील सर्व 46 प्रांतांचे प्रांत प्रचारक, सह प्रचारक आणि संघ प्रेरित विविध संघटनांचे अखिल भारतीय संघटनमंत्री उपस्थित आहेत. बैठकीत मार्च 2026 नंतर संघाच्या विविध स्तरांवर आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच शाखांमधील सुरू असलेल्या कार्ययोजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला जाणार असून, संघाच्या शताब्दी वर्षात (2025-26) शाखाविस्तार कितपत झाला याचे मूल्यांकन केले जाणार आहे. संघाचे शताब्दी वर्ष 20 ऑक्टोबर 2026 रोजी विजयादशमीपर्यंत साजरे करण्यात येणार आहे. या बैठकीत आतापर्यंत झालेल्या शताब्दी वर्षातील कार्यक्रमांचा आढावा घेतला जाईल, तसेच उर्वरित कार्यक्रमांचे नियोजन निश्चित करण्यात येईल. याशिवाय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या 2026-27 या वर्षातील प्रवास व विविध कार्यक्रमांच्या आराखड्यावरही चर्चा होणार आहे.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या प्राथमिक बैठकीत अयोध्या येथील राम मंदिरातील देणगी (चढावा) चोरी प्रकरणावरही चर्चा झाली. हा विषय अधिकृत अजेंड्यात नसला तरी या प्रकरणाबाबत संघामध्ये गंभीर स्तरावर विचारमंथन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अयोध्येत सुमारे आठवडाभर वास्तव्यास राहून संपूर्ण घडामोडींचा अभ्यास करणारे क्षेत्रीय व प्रांतीय स्तरावरील पदाधिकारी या बैठकीत आपला अहवाल सादर करू शकतात. या अहवालाच्या आधारे प्रकरणाशी संबंधित तथ्ये, संघटनेची प्रतिमा आणि पुढील वाटचालीवरही सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande