व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली, १५ जणांचा मृत्यू
नवी दिल्ली, 11 जुलै (हिं.स.) : व्हिएतनामला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांसोबत एक मोठा अपघात घडला आहे. हनोई येथील भारतीय दूतावासाने माहिती दिली की, शनिवारी व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ अनेक भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट उलटली. या अपघाताच
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली


नवी दिल्ली, 11 जुलै (हिं.स.) : व्हिएतनामला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकांसोबत एक मोठा अपघात घडला आहे. हनोई येथील भारतीय दूतावासाने माहिती दिली की, शनिवारी व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ अनेक भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट उलटली. या अपघाताची माहिती देण्यासाठी भारतीय दूतावासाने एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या अपघातात पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे.

दक्षिण व्हिएतनामच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्पीडबोट उलटल्याने १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हिएतनाममधील फु क्वोकजवळ, होन मे रुट न्गोई बेटाजवळ बोट उलटली तेव्हा त्यात ३२ भारतीय पर्यटक आणि चार कर्मचारी होते. २१ जणांना वाचवण्यात आले आहे. सर्व २१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. तसेच, सर्व १५ मृतदेह किनाऱ्यावर आणण्यात आले आहेत.

एका दुःखद घटनेत, शनिवारी व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ अनेक भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली, असे दूतावासाने एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत पीडितांना मदत आणि माहिती देण्यासाठी, हो चि मिन्ह शहरातील भारतीय वाणिज्य दूतावास आणि हनोईमधील दूतावासात २४-तास नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत आणि हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. पहिल्या नियंत्रण कक्षाशी +84 36 281 7930, +84 91 552 37 14, आणि +84 33 452 0414 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. हनोईमधील दुसऱ्या नियंत्रण कक्षाशी +84 91 308 9165 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

दूतावासाने कळवले आहे की, बाधित कुटुंबांना माहिती आणि मदत देण्यासाठी हो चि मिन्ह शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासात एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. ज्यांना मदतीची आवश्यकता आहे, ते या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande