कॅनडातील टोरंटो शहरातील महोत्सवात गोळीबार, दोन जणांचा मृत्यू
ओटावा, 12 जुलै (हिं.स.)।कॅनडातील टोरंटो शहरात शनिवारी संध्याकाळी एका स्ट्रीट फेस्टिव्हल दरम्यान गोळीबाराची घटना घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणारा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती
कॅनडातील टोरंटोमधील शहरातील महोत्सवात गोळीबार, दोन जणांचा मृत्यू


ओटावा, 12 जुलै (हिं.स.)।कॅनडातील टोरंटो शहरात शनिवारी संध्याकाळी एका स्ट्रीट फेस्टिव्हल दरम्यान गोळीबाराची घटना घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. गोळीबार करणारा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टोरंटो पोलिस सेवेनं या घटनेला सक्रिय गोळीबाराची घटना (अॅक्टिव्ह शूटिंग) असे संबोधले आहे. ही घटना मिडटाउन टोरंटो येथील ‘साल्सा ऑन सेंट क्लेअर’ या फेस्टिव्हलदरम्यान घडली. वृत्तानुसार, हा दरवर्षी आयोजित केला जाणारा लॅटिन सांस्कृतिक महोत्सव आहे.

पोलिसांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर दिलेल्या माहितीनुसार, अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना गोळी लागलेल्या सहा व्यक्ती आढळल्या. त्यापैकी दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी नागरिकांना या परिसरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

पोलिसांनी सांगितले की, अद्याप कोणत्याही संशयिताला ताब्यात घेण्यात आलेले नाही. तसेच, गोळीबार नेमका कोणत्या परिस्थितीत झाला याबाबत तत्काळ कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande