बावी चक्रीवादळानंतर चीनमध्ये भीषण पूर; रेल्वे सेवा स्थगित, प्रशासनाकडून 'रेड अलर्ट' जारी
बीजिंग , 14 जुलै (हिं.स.)। चीनच्या उत्तरेकडील हेबेई प्रांत आणि ईशान्येकडील लियाओनिंग प्रांतात बावी’ या चक्रीवादळानंतर भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या भीषण पुरामुळे रस्ते जलमय झाले असून अनेक वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत. स्थानिक
बावी चक्रीवादळानंतर चीनमध्ये भीषण पूर; रेल्वे सेवा स्थगित, प्रशासनाकडून 'रेड अलर्ट' जारी


बीजिंग , 14 जुलै (हिं.स.)। चीनच्या उत्तरेकडील हेबेई प्रांत आणि ईशान्येकडील लियाओनिंग प्रांतात बावी’ या चक्रीवादळानंतर भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या भीषण पुरामुळे रस्ते जलमय झाले असून अनेक वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत.

स्थानिक सरकारी माध्यमांनी प्रसारित केलेल्या एका रहिवाशाच्या माहितीनुसार, हेबेई प्रांतातील कुआनचेंग काउंटीमध्ये रस्त्यांवरील पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक झाली होती. तेथे जलमय रस्त्यांवर अनेक कार एकमेकांवर आदळताना आणि पाण्याच्या लाटांमुळे वर-खाली उसळताना दिसल्या. वृत्तानुसार, चीनच्या मुख्य भूभागावर यंदा धडकलेल्या सर्वात शक्तिशाली ‘बावी’ या चक्रीवादळानंतर ही पूरस्थिती निर्माण झाली आहे.

अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की ‘बावी’ वादळामुळे जिलिन, लियाओनिंग, हेबेई, शानदोंग, जिआंगसू आणि आन्हुई या प्रांतांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच पावसामुळे जलमय झालेल्या भागांमध्ये पूरस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. सरकारी प्रसारक वृत्तानुसार, कुआनचेंगमध्ये सुमारे १,८०० ग्रामीण नागरिक अडकले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर आणि पुनर्वसन करणे हे सध्या त्यांचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

लियाओनिंग प्रांतात अचानक येणाऱ्या पुराच्या धोक्यामुळे ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला असून परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. हेबेई प्रशासनाने वीचॅटवर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट लागू असताना सर्व प्रकारची कामे बंद ठेवणे, व्यावसायिक आस्थापना तात्पुरत्या बंद करणे आणि सार्वजनिक जमावांवर निर्बंध लावणे या उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी केली जावी.

चीन रेल्वे प्रशासनाने सोमवारी सांगितले की, शेनयांगमधील अनेक रेल्वे सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या असून याचा परिणाम रेल्वे मार्गांच्या ३० हून अधिक विभागांवर झाला आहे. ईशान्येकडील जिलिन प्रांतासह अनेक भागांमध्ये शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande