थायलंडमधील पबला भीषण आग; २७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
बँकॉक, 13 जुलै (हिं.स.)।थायलंडची राजधानी बँकॉक येथे सोमवारी पहाटे एका पबमध्ये भीषण आग लागलंताची घटना घडली. या दुर्घटनेत किमान २७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाने सुमारे अर्धा तास प्
थायलंडमधील पबला भीषण आग; २७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी


बँकॉक, 13 जुलै (हिं.स.)।थायलंडची राजधानी बँकॉक येथे सोमवारी पहाटे एका पबमध्ये भीषण आग लागलंताची घटना घडली. या दुर्घटनेत किमान २७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाने सुमारे अर्धा तास प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. बचाव पथकांनी सांगितले की, उशिरा रात्री आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये उत्तर बँकॉकमधील या पबच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रचंड ज्वाळा उसळताना दिसत आहेत. जीव वाचवण्यासाठी नागरिक बाहेर पळताना दिसले, तर परिसरात काळ्या धुराचे दाट ढग पसरले होते.

अधिकाऱ्यांच्या मते, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला जवळपास ३० मिनिटे लागली. दुर्घटनेनंतर समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये पबमधील जळालेल्या खुर्च्या, टेबल आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले बांधकाम दिसून येत आहे. सध्या अधिकारी या दुर्घटनेची सविस्तर चौकशी करत असून मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नवीराकुल यांनी घटनास्थळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याची सखोल चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वीही २०२२ मध्ये देशाच्या पूर्वेकडील भागातील एका म्युझिक पबमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाला होता. याआधी १ जानेवारी २००९ रोजी बँकॉकमधील सॅन्टिका नाईटक्लबमध्ये नववर्ष स्वागत समारंभादरम्यान लागलेल्या आगीत ६६ जणांचा मृत्यू झाला होता, तर २०० हून अधिक जण जखमी झाले होते. त्या दुर्घटनेचे कारण बंदिस्त जागेत करण्यात आलेली फटाकेबाजी असल्याचे सांगितले गेले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande