अमेरिकन सीनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये जल्लोष
तेहरान, 14 जुलै (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या हल्ल्याचे समर्थन करणारे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या मृत्यूनंतर तेहरानमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. ग्रॅहम हे इराणला आंतरराष्ट्रीय स्तरावर एका
अमेरिकन सीनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये जल्लोष


तेहरान, 14 जुलै (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या हल्ल्याचे समर्थन करणारे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांच्या मृत्यूनंतर तेहरानमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. ग्रॅहम हे इराणला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पाडणे आणि त्याच्या अणुकार्यक्रमावर निर्बंध आणण्याचे प्रमुख समर्थक होते. दरम्यान, एका वृत्तपत्राने इशारा दिला आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर अमेरिकन अधिकाऱ्यांचा अचानक मृत्यू होऊ शकतो.

इराण सरकारशी संबंधित वृत्तसंस्थेने म्हटले, “ग्रॅहम यांचे निधन झाले असून, इराणच्या विनाशाची त्यांची इच्छा त्यांच्यासोबतच कबरीत गेली.” सरकारी दूरदर्शनवरील एका सूत्रसंचालकाने म्हटले की, “ही बातमी इतकी आनंददायी आहे की मी ती दोनदा वाचत आहे.” इराणच्या सरकारी माध्यमातील एका वृत्तनिवेदकाने ग्रॅहम यांच्या मृत्यूमध्ये तेहरानचा हात असल्याचे सूचित करत म्हटले, “इराणविरोधी आणि युद्धाला चिथावणी देणारे अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांना नरकात पाठवण्यात आले आहे, याबद्दल मी इराणी जनतेचे अभिनंदन करतो.”

इराणच्या एका वृत्तपत्राने पहिल्या पानावर एक छायाचित्र प्रसिद्ध केले होते, ज्यामध्ये ट्रम्प हे लिंडसे ग्रॅहम यांच्या छायाचित्राजवळ गुडघे टेकून बसलेले दाखवले होते. त्या छायाचित्रावर “अचानक मृत्यूसाठी तयार राहा” अशी मथळी देण्यात आली होती. सोशल मीडियावर सरकारसमर्थकांनी एक ग्राफिकही शेअर केले. त्यात फेब्रुवारी महिन्यात इराणवरील हल्ल्यानंतर सूड उगवण्यासाठी निवडलेल्या अनेक व्यक्ती दाखवण्यात आल्या होत्या. या ग्राफिकमध्ये ग्रॅहम यांच्या चेहऱ्यावर लाल रंगाची क्रॉसची खूण होती, म्हणजे लक्ष्य ठरवलेल्या व्यक्तींमध्ये फक्त त्यांनाच संपवण्यात आल्याचे दर्शविण्यात आले होते.

या बातम्यांमुळे ट्रम्प यांच्या “मेक अमेरिका ग्रेट अगेन” (MAGA) समर्थकांमध्ये विविध कटकारस्थानांच्या सिद्धांतांना चालना मिळाली आहे. अनेकांनी त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून, इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स कडून पूर्वी देण्यात आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांचाही उल्लेख केला आहे.

वॉशिंग्टन डी.सी. येथील मुख्य वैद्यकीय परीक्षक कार्यालयाने रविवारी सांगितले की, सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांचा मृत्यू आर्टेरिओस्क्लेरोटिक हृदयविकारामुळे झालेल्या एओर्टिक डिसेक्शनमुळे झाला असावा. एओर्टिक डिसेक्शन ही अत्यंत गंभीर आणि जीवघेणी वैद्यकीय आपत्कालीन अवस्था आहे. यात शरीरातील सर्वात मोठ्या रक्तवाहिनी असलेल्या एओर्टाच्या आतील भिंतीला भेग पडते किंवा ती फाटते. कार्यालयाने स्पष्ट केले की, विषतज्ज्ञ (टॉक्सिकोलॉजिकल) आणि सूक्ष्मदर्शकीय (मायक्रोस्कोपिक) तपासण्या पूर्ण होईपर्यंत मृत्यू प्रमाणपत्र प्रलंबित राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande