व्हीएसएल पॉवरहाईव्हतर्फे प्रगत घरगुती ऊर्जा, सौर ऊर्जा साठवणूक पर्यांयासह व्हीऑन पोर्टफोलिओचे विस्तारीकरण
कोलकाता, 15 जुलै (हिं.स.) : विक्रम सोलर लिमिटेडची बॅटरी आणि ऊर्जा साठवणूक शाखा असलेल्या ''व्हीएसएल पॉवरहाईव्ह प्रायव्हेट लिमिटेड''ने आपल्या व्हीऑन (VION) या प्रमुख ब्रँडच्या विस्ताराची घोषणा केली आहे. या विस्तारांतर्गत त्यांनी ग्राहकांसाठी १० kWh
VSL PowerHive VION


कोलकाता, 15 जुलै (हिं.स.) : विक्रम सोलर लिमिटेडची बॅटरी आणि ऊर्जा साठवणूक शाखा असलेल्या 'व्हीएसएल पॉवरहाईव्ह प्रायव्हेट लिमिटेड'ने आपल्या व्हीऑन (VION) या प्रमुख ब्रँडच्या विस्ताराची घोषणा केली आहे. या विस्तारांतर्गत त्यांनी ग्राहकांसाठी १० kWh आणि १५ kWh क्षमतेच्या लिथियम आयर्न फॉस्फेट (एलएफपी) दोन नवीन ऊर्जा साठवणूक प्रणाली आणल्या आहेत.

विविध ऊर्जा साठवणूक उत्पादनांना मिळालेला उत्तम प्रतिसाद लक्षात घेत कंपनीने व्हीऑन आपल्या उत्पादनांचा विस्तार केला आहे. भारताच्या झपाट्याने वाढत असलेली निवासी ऊर्जा साठवणूक प्रणाली (RESS) आणि घरांच्या छतावरील सौर ऊर्जा क्षेत्रासाठी कंपनीने या उच्च क्षमतेच्या बॅटरी प्रणाली आणल्या आहेत. यामुळे ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकीचा पूर्ण लाभ घेता येणार आहे. या नवीन १० kWh आणि १५ kWh क्षमतेच्या दोन ऊर्जा साठवणूक प्रणाली घरमालकांना निवासी ऊर्जा साठवणूक प्रणाली अर्थात RESS आणि छत सौर ऊर्जा या दोन्हीचे फायदे जास्तीत जास्त वाढवण्यास, त्यांचे मुख्य ग्रीड वीज पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी करण्यास आणि गरज पडेल तेव्हा अतिशय खात्रीशीर वीजपुरवठा (बॅकअप) मिळवून देण्यास मदत करतात.

नवीन व्हीऑन बॅटरी प्रणाली प्रगत लिथियम आयर्न फॉस्फेट तंत्रज्ञानावर आधारलेली आहे. ही प्रणाली विश्वासार्ह आणि दीर्घकाळ कामगिरी करत राहते. . ही प्रणाली घरगुती ऊर्जा साठवणूक (RESS) आणि छत सौर ऊर्जा अशा दोन्ही वापरांसाठी तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे सरकारी ग्रीडवरून किंवा सौर ऊर्जेतून मिळणारी वीज कार्यक्षमतेने साठवून ठेवता येते आणि गरजेच्या वेळी तिचा वापर करून ऊर्जेचा पुरेपूर लाभ घेता येतो. या प्रणालीमध्ये अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत. तिच्यामध्ये असलेली स्मार्ट बीएमएस (बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम) बॅटरीच्या कामगिरीवर सतत लक्ष ठेवते आणि तिची सुरक्षितता, विश्वासार्हता व कार्यक्षमता वाढवण्याकडे सदैव लक्ष ठेवते. ही प्रणाली उच्च क्षमतेसाठी तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे घरातील जास्त वीज वापरणारे उपकरणही विनासायास सुरु राहते आणि दीर्घकाळ बॅकअप मिळतो. या बॅटरीला शून्य देखभाल लागते आणि त्यामुळे ग्राहकांना कोणतीही अडचण येत नाही आणि अखंड वीजपुरवठा सुरु राहतो. भारतात हवामानात असलेली विविधता आणि वातावरणात सतत होणारे बदल लक्षात घेऊन या बॅटऱ्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या कोणत्याही परिस्थितीत खात्रीशीर काम करु शकतात. दीर्घकालीन विश्वासार्हतेसाठी प्रत्येक प्रणालीवर ६० महिन्यांची (५ वर्षे) व्यापक वॉरंटी कंपनीने दिलेली आहे.

कंपनीने आणलेल्या या नवीन बॅटरीबाबत भाष्य करताना व्हीएसएल पॉवरहाईव्ह प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरुण मित्तल म्हणाले, आमच्या १० kWh आणि १५ kWh क्षमतेच्या व्हीऑन ऊर्जा साठवणूक प्रणालींचे बाजारात झालेले आगमन भारताच्या बदलत्या ऊर्जा क्षेत्रासाठी एक सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी सज्ज अशी ऊर्जा परिसंस्था निर्माण करण्याच्या आमच्या मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. सध्या ऊर्जा साठवणुकीचा कल मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. तसेच ग्राहक आपल्या गुंतवणुकीवर अधिकाधिक लाभ घेण्यासाठी आणि ऊर्जेच्या बाबतीत अधिक स्वावलंबी होण्यासाठी विश्वासार्ह व कार्यक्षम अशा पर्यायांच्या शोधात आहेत. उत्कृष्ट साठवणूक क्षमतेसाठी तयार केलेल्या या नवीन व्हीऑन प्रणालींमध्ये प्रगत एलएफपी तंत्रज्ञान, इंटेलिजेंट बॅटरी मॅनेजमेंट आणि उच्च दाब क्षमतेची कामगिरी या सर्वांचा मिलाफ घडविण्यात आला आहे. त्यामुळे गरज पडेल तेव्हा शाश्वत आणि खात्रीशीर वीजपुरवठा होऊ शकेल. व्हीऑनच्या विस्तारामुळे आम्ही घरमालक आणि व्यावसायिकांना भविष्यासाठी अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि सक्षम असा ऊर्जा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

उच्च क्षमतेच्या विविध प्रकारांचा समावेश केल्याने, व्हीएसएल पॉवरहाईव्हचा अशा विस्तारणाऱ्या ऊर्जा साठवणूक पर्यायांबद्दलची कटिबद्धता आणखी मजबूत झाली आहे. तसेच त्यातून भारताच्या स्वच्छ, अधिक सक्षम आणि विकेंद्रित स्वरुपातील ऊर्जेच्या भविष्याला पाठबळसुध्दा मिळाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande