
बँकेच्या उपाध्यक्षपदी रामराव शेळके बिनविरोध
छत्रपती संभाजीनगर, २० जुलै (हिं.स.) : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी आमदार विलास (बापू) संदिपान भुमरे, तर व्हाईस चेअरमनपदी रामराव शेळके यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांसह जिल्ह्यातील विविध नेते, पदाधिकारी आणि मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाच्या संयुक्त प्रयत्नांतून बँकेच्या प्रगतीला नवे बळ मिळेल, तसेच शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्यांचा विश्वास अधिक दृढ होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. सहकार क्षेत्रात बँक नवी उंची गाठेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय शिरसाठ, राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉ. कल्याणराव काळे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रा. रमेश बोरणारे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे, आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार संजनाताई जाधव, डॉ. दिनेश परदेशी यांच्यासह बँकेचे नवनिर्वाचित संचालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis