
छत्रपती संभाजीनगर, 20 जुलै (हिं.स.)।
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धेचा दिमाखदार समारोप झाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त स्थायी समिती सभापती श्री. अनिल मकरीये यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघांचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
स्पर्धेतील खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्त आणि क्रीडाभावाचे दर्शन घडविले. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये निरोगी स्पर्धा, नेतृत्वगुण आणि सामाजिक एकात्मतेची भावना अधिक बळकट होते.
यावेळी माजी उपमहापौर श्री. राजू शिंदे, गुलमंडी मंडळ अध्यक्ष श्री. महेश मल्लेकर, श्री. शंकर म्हात्रे, श्री. मुकेश जाधव, श्री. यंदनेश बसय्ये आणि श्री. अजय पारखे यांची उपस्थिती लाभली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis