छ. संभाजीनगर- डॉ.अश्विन रांजणीकर यांच्या संशोधनाला 'कॉपीराईट' प्रदान
-''अश्वीना : पंचकोश व्यक्तिमत्व विकास मापन श्रेणी''स भारत सरकारचा प्रताधिकार प्रदान छत्रपती संभाजीनगर, 20 जुलै (हिं.स.) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील निरंतर शिक्षण व विस्तार सेवा विभागाचे संचालक डॉ.अश्विन पुरुषोत्तम रांजणीकर यांच्य
छ. संभाजीनगर- डॉ.अश्विन रांजणीकर यांच्या संशोधनाला 'कॉपीराईट' प्रदान


-'अश्वीना : पंचकोश व्यक्तिमत्व विकास मापन श्रेणी'स भारत सरकारचा प्रताधिकार प्रदान

छत्रपती संभाजीनगर, 20 जुलै (हिं.स.) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील निरंतर शिक्षण व विस्तार सेवा विभागाचे संचालक डॉ.अश्विन पुरुषोत्तम रांजणीकर यांच्या संशोधन कार्यास ’कॉपीराईट’ प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्यावतीने ’अश्वीना : पंचकोश व्यक्तिमत्व विकास मापणश्रेणी’स भारत सरकारचा प्रताधिकार प्राप्त झाला आहे.

या संदर्भात डॉ.रांजणीकर यांनी भारत सत्कारच्या कॉपीराईट कार्यालयास प्रस्ताव सादर केला होता. कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली या विभागतात ते सध्या कार्यरत आहेत. डॉ. अश्विन रांजणीकर यांच्या 'अश्वीना : पंचकोश व्यक्तिमत्त्व विकास मापनश्रेणी (ASHVEENA: Panchkosh Personality Development Scale – PPDS) भारत सरकारचा प्रताधिकार (copyright) प्रदान: अश्वीना : पंचकोश व्यक्तिमत्त्व विकास मापनश्रेणी (ASHVEENA: PPDS) ही भारतीय ज्ञान परंपरेतील उपनिषदात प्रतिपादित पंचकोश सिद्धांतावर आधारित व्यक्तिमत्त्व मापनाची एक अभिनव, वैज्ञानिक व सर्वसमावेशक मानसशास्त्रीय मापनश्रेणी असून या संदर्भातील हा प्रताधिकार आहे.

भारतीय ज्ञान परंपरेतील पंचकोश संकल्पनेला आधुनिक वैज्ञानिक चौकटीत सादर करून ASHVEENA: Panchkosh Personality Development Scale (PPDS) ही व्यक्तिमत्त्व मापनाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण आणि मौलिक योगदान आहे. भारतीय तत्त्वज्ञान, आधुनिक मानसशास्त्र आणि संशोधनाधिष्ठित मापनशास्त्र यांचा समन्वय साधणारी ही मापनश्रेणी व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा अभ्यास, संवर्धन आणि मूल्यांकन करण्यासाठी एक प्रभावी, विश्वसनीय आणि कालसुसंगत साधन म्हणून उदयास आली आहे. याची निर्मिती डॉ. अश्विन रांजणीकर यांनी केली आहे.त्यांची १६ पुस्तके प्रकाशित झाली असून, ४० पेक्षा अधिक संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत. १८ राष्ट्रीय परिषद, कार्यशाळा व चर्चासत्रे यांचे आयोजन त्यांनी केले आहे. ५५ पेक्षा अधिक कार्यक्रमासांठी त्यांना साधनव्यक्ति म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. तर पाच पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande