पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन... जीवन धन्य झाले!- माजी खासदार कराड
छत्रपती संभाजीनगर, 20 जुलै (हिं.स.)। पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन... जीवन धन्य झाले!असे माजी खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितले भाजप नेते डॉ भागवत कराड म्हणाले, आषाढी एकादशीच्या पवित्र आणि मंगलमय पर्वानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर, येथे श्र
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 जुलै (हिं.स.)।

पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन... जीवन धन्य झाले!असे माजी खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितले

भाजप नेते डॉ भागवत कराड म्हणाले,

आषाढी एकादशीच्या पवित्र आणि मंगलमय पर्वानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर, येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी सहपरिवार दर्शन घेण्याचे परमभाग्य लाभले. विठुरायाच्या पवित्र चरणी नतमस्तक होताना मन भक्तिभावाने भरून आले. ही अविस्मरणीय अनुभूती आयुष्यभर प्रेरणा देणारी आहे.

करुणामूर्ती श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांच्या चरणी प्रार्थना केली की, आपल्या महाराष्ट्रावर सदैव कृपादृष्टी राहो. राज्यातील प्रत्येक कुटुंब सुखी, निरोगी आणि समृद्ध होवो. आपल्या महाराष्ट्रातील कष्टकरी बळीराजाच्या श्रमाला योग्य मोबदला मिळो, त्याच्या शेतात भरघोस पीक येवो, संकटे दूर होवोत आणि प्रत्येक शेतकऱ्याचे जीवन आनंद, समाधान आणि समृद्धीने फुलून जावो.

संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि विकासाचा मार्ग अधिक बळकट होवो. विठ्ठल-रुक्मिणींच्या कृपेने प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच चरणी विनम्र प्रार्थना.केली असल्याचे त्यांनी सांगितले

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande