
यवतमाळ, 20 जुलै (हिं.स.)।
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांनी धडक दिली. सुरवातीला जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कक्षात आढावा बैठक घेण्यात आली. तद्नंतर अवधूतवाडी पोलिस ठाण्यात ‘सरप्राईज व्हिजिट’ दिली. यावेळी ठाण्यात आयजींना मानवंदना देण्यात आली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत दरोडा, घरफोडी, खुनांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. या घटनांमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. अशात शनिवारी सकाळी अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांनी यवतमाळात धडक दिली. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांच्यासह इतरही अधिकार्!यांच्या उपस्थिती आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत विविध महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, आढावा बैठकीनंतर पोलिस महानिरीक्षकांनी थेट अवधूतवाडी पोलिस ठाण्यात भेट दिली. या ठिकाणी पोचताच ठाणेदार अजित कदम यांच्यासह अधिकारी, कर्मचार्!यांनी त्यांना मानवंदना दिली. त्या ठिकाणी आवश्यक बाबींची पाहणी केली. पांढरकवडा येथील ९७ लाखांचा दरोडा आणि स्थानिक गुन्हे शाखेने करळगाव घाटात अटक केलेल्या चोरट्यांनी केलेल्या १६ घरफोड्यांचे अमरावती कनेक्शन, या मोठ्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासह प्रलंबित गुन्ह्यांची उकल करण्यासाठी अधिकार्!यांना अत्यंत कडक आणि महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. पोलिस महानिरीक्षकांच्या भेटीची माहिती मिळताच गुन्हेगारांसह अवैध व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले होते.
अधिकारी, कर्मचारी अलर्ट
शहरातील हायप्रोफाइल समजल्या जाणार्!या अवधूतवाडी पोलिस ठाण्यात आज पोलिस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील यांनी अचानक भेट दिली. आयजी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाल्याचे पाहताच पोलिस वर्तुळात खळबळ उडाली होती. यावेळी संपूर्ण पोलिस ठाण्याचे आयजीं डॉ. पाटील यांनी बारकाईने निरीक्षण केले.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी