परभणी जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत 21 संचालक पदांपैकी 13 संचालक बिनविरोध
परभणी, 20 जुलै (हिं.स.)परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतआ.सईद खान,आ्.चंद्रकांत नवघरे या दोघांसह सौ.राजमती मुटकुळे,आकाश चोखट,नंदकुमार डाखोरे, अभय सावंत,श्रीमती शोभा बोबडे, दत्तात्रय मायंदळे हे आठ उमेदवार विजयी झाले आह
परभणी जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत  आ.सईदखान,आ.नवघरे यांच्यासह मुटकुळे, चोखट,डाखोरे, सावंत,श्रीमती बोबडे व मायदंळे विजयी.


परभणी, 20 जुलै (हिं.स.)परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतआ.सईद खान,आ्.चंद्रकांत नवघरे या दोघांसह सौ.राजमती मुटकुळे,आकाश चोखट,नंदकुमार डाखोरे, अभय सावंत,श्रीमती शोभा बोबडे, दत्तात्रय मायंदळे हे आठ उमेदवार विजयी झाले आहेत. बँकेच्या एकूण 21 संचालक पदांपैकी 13 संचालक बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित 8 जागांसाठी रविवारी मतदान झाले.तर आज दुपारी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली.

प्राथमिक कृषी पतपुरवठा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गटातील पूर्णा मतदारसंघातून नंदकुमार डाखोरे हे ऑटोरिक्षा या निवडणूक चिन्हावर विजयी झाले आहेत.त्याचे प्रतिस्पर्धी तुळशीराम बोबडे हे कपबशी या चिन्हावर उभे होते ते पराभूत झाले.

मानवत मतदारसंघातून बँकेचे ज्येष्ठ संचालक तथा उपाध्यक्ष पंडितराव चौखट यांचे सुपुत्र आकाश चौखट हे विजयी झाले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी अमोल कदम हे ऑटोरिक्षा या निवडणुकीत उतरले होते,

हिंगोली मतदारसंघातून आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या कुटुंबातील सौ. राजामती मुटकुळे या कपबशी या निवडणूक चिन्हावर विजयी झाल्या आहेत.रमेश शिंदे हे छत्री व गुलाबराव सरकटे हे कपाट या चिन्हावर रिंगणात उतरले होते.ते दोघे पराभूत झाले.

वसमत मतदारसंघातून तुषार जाधव हे अंगठी आणि आ.चंद्रकांत नवघरे हे कपबशी या निवडणूक चिन्हावर उभे होते.येथून आमदार नवघरे हे विजय झाले आहेत.

कळमनुरी मतदारसंघातून अभय सावंत हे विजयी झाले. दत्तराव कदम यांना कपाट व बालासाहेब मगर यांना छताचा पंखा हे चिन्ह मिळाले होते.

इतर शेती संस्था गटातून आ.खान सय्यद शेरगुल खान यांना छत्री, प्रीती जाधव यांना जग, विजय जामकर यांना कपबशी, विजयकुमार मोरे यांना मोबाईल आणि सय्यद हरसान हुसैनी यांना चष्मा हे चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरले होते. या गटात अपेक्षेप्रमाणे आ.सईद खान व जामकर यांच्यात तूल्यबळ लढत झाली, त्या लढतीतून आ.खान हे अल्पशा म्हणजे तीन मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत.

अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून प्रशास ठाकूर यांना अंगठी, शोभा बोबडे यांना कपबशी, तुकाराम रुमाले यांना ट्रॅक्टर, यशवंतराव वाटोड यांना शिटी, अतुल सरोदे यांना छत्री आणि संजय सारणीकर यांना हेलिकॉप्टर हे चिन्ह देण्यात आले.येथून बहूरंगी लढतीत श्रीमती बोबडे या विजयी झाल्या.

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातील उमेदवार अभय कुंडगीर यांना खटारा, स्वराजसिंह परिहार यांना छत्री, सुनंदा फुलके यांना शिटी, दत्तात्रय मायंदळे यांना कपबशी आणि बळीराम सोरेकर यांना शिवणयंत्र हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.येथून बँकेचे विद्यमान संचालक दत्तात्रय मायदंळे विजय झाले. असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारीयांनी दिलासाशी बोलताना दिली

उमेदवारांना मिळालेली मते:

प्राथमिक कृषी पतपुरवठा

मानवत गट -

अमोल कदम १५

आकाश चोखट २०

..........

पूर्णा गट-

डाखोरे नंदकुमार ३४

तुळशीराम बोबडे २८

.........

हिंगोली गट:

मुटकुळे राजामती ५९

शिंदे रमेश विठ्ठलराव ३१

सरकटे गुलाबराव ००

एकूण मत 90

........

कळमनुरी गट :

अभय सावंत-३५

कदम -१२

बाळासाहेब मगर-३

….….....

वसमत गट -

नवघरे चंद्रकांत -५८

तुषार जाधव- २०

.........

सईद खान -२९०

विजय जामकर- २८७

........

परिहार स्वराजसिंह -३४८

सुनंदा फलके -९

दत्तात्रय माईंदळे -१०६६

बळीराम सोरेकर- ३

कुंडगिर-५......

ठाकूर प्रशास -१२

बोबडे शोभा- १२१६

सरोदे अतुल -१७६

संजय सारणीकर -३

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande