आमदार भास्कर जाधव यांच्याकडून रत्नागिरी जिल्हा बँकेचे अभिनंदन
रत्नागिरी, 20 जुलै (हिं.स.) । चिपळूणचे आमदार भास्करराव जाधव यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत केलेल्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून अध्यक्ष, संचालक व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. याबाबत बँकेला पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात
आमदार भास्कर जाधव यांच्याकडून रत्नागिरी जिल्हा बँकेचे अभिनंदन


रत्नागिरी, 20 जुलै (हिं.स.) । चिपळूणचे आमदार भास्करराव जाधव यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत केलेल्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून अध्यक्ष, संचालक व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

याबाबत बँकेला पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात की, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जो या वर्षाचा अहवाल सादर केला आहे, त्यामध्ये बँकेची होत असलेली प्रगती समाधानकारक अशी आहे. प्रगतीची अनेक ध्येये ओलांडून बँकेने ग्रामीण दुर्गम भागातील शेतकऱ्यांना डिजिटल प्रवाहात आणून डिजिटल बँकिंग व्यवहारात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याबद्दल मला अभिमान आहे. त्यासाठी संचालक व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत.

श्री. जाधव यांचा सकारात्मक पाठिंबा आणि बँकेबद्दलची आस्था सर्वांना ऊर्जा देणारी आहे, अशा शब्दांत बँकेच्या संचालक मंडळाने श्री. जाधव यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande