नांदेड जिल्हा बँकेच्या संचालकपदी आ. प्रताप पाटील चिखलीकर बिनविरोध
नांदेड, २० जुलै (हिं.स.) : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांनी ही निवड केवळ वैयक्तिक सन्मान नसून जनतेने आणि सहकाऱ्यांनी दाखविलेल्या विश्वास
अ


नांदेड, २० जुलै (हिं.स.) : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांनी ही निवड केवळ वैयक्तिक सन्मान नसून जनतेने आणि सहकाऱ्यांनी दाखविलेल्या विश्वासाची पावती असल्याची भावना व्यक्त केली.

चिखलीकर यांनी पक्षाचे नेतृत्व, ज्येष्ठ मार्गदर्शक, सहकारी तसेच मतदार बांधवांचे मनःपूर्वक आभार मानले. मला बिनविरोध निवडून काम करण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचा मी ऋणी आहे. ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी कटिबद्ध राहीन, असे त्यांनी सांगितले.

या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी आणि व्यापारी बांधवांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

निवड जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष भेटी, दूरध्वनी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. आपल्या प्रेम आणि विश्वासामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून, हा विश्वास कायम राखण्यासाठी मी सातत्याने कार्यरत राहीन, असेही आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande