परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी रेणुकामातेच्या चरणी
बीड, 20 जुलै (हिं.स.) परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी आई रेणुकामातेच्या चरणी एकच साकडे घातले.हे माऊली, आता लवकर मुसळधार पाऊस पडू दे. परळी वैजनाथ आणि संपूर्ण परिसरावर तुझी कृपादृष्टी राहू दे. माहूरगड निवासिनी, आदिश
अ


बीड, 20 जुलै (हिं.स.) परळी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांनी आई रेणुकामातेच्या चरणी एकच साकडे घातले.हे माऊली, आता लवकर मुसळधार पाऊस पडू दे. परळी वैजनाथ आणि संपूर्ण परिसरावर तुझी कृपादृष्टी राहू दे. माहूरगड निवासिनी, आदिशक्ती कुलदैवत श्री रेणुका मातेच्या पवित्र चरणी अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि कृतज्ञतेने नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी बोलताना नगराध्यक्षा धर्माधिकारी म्हणाल्या की,आई रेणुकामातेच्या चरणी एकच साकडे घातले. हे माऊली, आता लवकर मुसळधार पाऊस पडू दे. परळी वैजनाथ आणि संपूर्ण परिसरावर तुझी कृपादृष्टी राहू दे. जलसंजीवक ठरलेल्या नागापूर येथील वाण प्रकल्पाला भरभरून पाणी लाभू दे आणि तो लवकरात लवकर ओसंडून वाहू दे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा जीवनाचा आधार आहे. भरलेले धरण म्हणजे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान, जनावरांसाठी पाण्याची हमी, शहराच्या पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता आणि भविष्यासाठी आश्वासक उद्या. आई रेणुकामातेच्या कृपेने शेतकरी राजाच्या कष्टाला भरघोस पीक लाभो, प्रत्येक शिवार हिरवाईने नटू दे, प्रत्येक विहीर आणि ओढा तुडुंब भरू दे, प्रत्येक घरात आनंद, समाधान आणि समृद्धी नांदू दे, अशी मनःपूर्वक प्रार्थना केली.परळीसह संपूर्ण परिसरावर आई रेणुकामातेचे अखंड आशीर्वाद राहोत. दुष्काळाचे सावट दूर होऊन भरघोस पाऊस पडो, नागापूरचा वाण प्रकल्प ओसंडून वाहो

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande