पुणे-शिवाजीनगरमध्ये वाहतूक कोंडीवर उपाय; ७३ कोटींच्या उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा
पुणे, 20 जुलै (हिं.स.) । शिवाजीनगर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित साखर संकुल ते जुना पुणे–मुंबई रस्ता या दरम्यानच्या ग्रेड सेपरेटर (उड्डाणपूल) प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे ७३ कोटी ५१ लाख ६९ हजार २५० रुपये खर्चाच्य
Fly over pool


पुणे, 20 जुलै (हिं.स.) । शिवाजीनगर परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित साखर संकुल ते जुना पुणे–मुंबई रस्ता या दरम्यानच्या ग्रेड सेपरेटर (उड्डाणपूल) प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे ७३ कोटी ५१ लाख ६९ हजार २५० रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी आर्थिक दायित्व स्वीकारण्यास महापालिकेच्या स्थायी समितीमार्फत मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ७२ (ब) अंतर्गत या कामासाठी मुख्य सभेची मान्यता मिळावी, यासाठी महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.शिवाजीनगर येथील साखर संकुल परिसरातून जुना पुणे–मुंबई रस्त्याकडे जाण्यासाठी सध्या वाकडेवाडी अंडरपासचा वापर केला जातो. मात्र, या अंडरपासची वाहतूक क्षमता अपुरी पडत असल्याने सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते.ही समस्या सोडवण्यासाठी नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आमदारांकडून सातत्याने मागणी होत होती.

त्यानुसार महापालिकेच्या प्रकल्प विभागाने या ठिकाणी उड्डाणपूल अथवा ग्रेड सेपरेटर उभारण्याचे नियोजन केले आहे.या प्रकल्पासाठी १४ ऑगस्ट २०२५ रोजी मे. प्रितम एन्टरप्रायजेस या संस्थेची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सल्लागार संस्थेने परिसराचे टोपोग्राफिकल सर्वेक्षण, भूगर्भीय तपासणी आणि वाहतूक अभ्यास करून प्रकल्पाचा आराखडा तयार केला.यानंतर सविस्तर आराखडे, अंदाजपत्रक आणि तांत्रिक माहिती महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडे सादर करण्यात आली आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande