लातूर : सारणी गावात अनेक वषार्नतर एसटीबस दाखल
लातूर, 20 जुलै (हिं.स.) : औसा तालुक्यातील सारणी येथे गेल्या कित्येक वषार्पासून शालेय विद्यार्थ्यांना व प्रवाशांना एसटी बस सुविधा मिळत नव्हती. ग्रामस्थांनी औसा येथे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार अभिमन्यू पवार यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात. सार
बहुप्रतीक्षेनंतर नंतर बस गावात अवतरली


लातूर, 20 जुलै (हिं.स.) : औसा तालुक्यातील सारणी येथे गेल्या कित्येक वषार्पासून शालेय विद्यार्थ्यांना व प्रवाशांना एसटी बस सुविधा मिळत नव्हती. ग्रामस्थांनी औसा येथे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार अभिमन्यू पवार यांनी आयोजित केलेल्या जनता दरबारात. सारणी ग्रामस्थांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. खासदार आमदार यांनी तात्काळ यांची दखल घेत. आगार व्यवस्थापक यांना तात्काळ बस सेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते. अखेर तो दिवस उजाडला आणि सरपंच तुकाराम वाघमारे व उपसरपंच रतन तमशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश आलं. सारणी ग्रामस्थांचे गेल्या कित्येक वषार्पासूनची

बस सेवा चालू व्हावी यासाठी मागणी होती अनेक वेळा ग्रामपंचायतच्या माध्यमातून व ग्रामस्थांच्या वतीने एसटी महामंडळाकडे मागणी करून ही बस सुरू होत नव्हती. अनेक वषार्पासून सारणी गावातील ग्रामस्थांना व शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन प्रवास करत असताना अनंत अडचणी येत होत्या. या अडचणी लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाठपुरावा करून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून व औसा महामंडळाचे स्वामी यांच्या वतीने अखेर माकणी मार्गे सारणी बस सेवा सुरू झाली व अनेक वषानंतर गावात पहिल्यांदाच एसटी बस धावल्याने विद्यार्थी व ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा करत लालपरी बस ची पूजा करून प्रवास केला. यावेळी सारणी गावचे सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांनी एस टी ची पूजा करून आनंद उत्सव साजरा केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande