यवतमाळ जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे सावट
यवतमाळ, 20 जुलै (हिं.स.)। जुलैच्या सुरवातीला धुवाधार कोसळलेल्या पावसाने शेतशिवार जलमय झाले. नद्या-नाले प्रवाहित झाले. अनेक मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र, त्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून वरुणराजाने विश्रांती घेतल्याने खरीप पिकांसमोर नवे संक
जिल्ह्यात कोरड्या दुष्काळाचे सावट खरीप पिके पावसाच्या प्रतीक्षेत; दहा दिवसांपासून पावसाचा खंड


यवतमाळ, 20 जुलै (हिं.स.)।

जुलैच्या सुरवातीला धुवाधार कोसळलेल्या पावसाने शेतशिवार जलमय झाले. नद्या-नाले प्रवाहित झाले. अनेक मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. मात्र, त्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून वरुणराजाने विश्रांती घेतल्याने खरीप पिकांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. खते, डवरणी आणि कीटकनाशक फवारणीची कामे पूर्ण झाल्यानंतर आता पिकांच्या जोमदार वाढीसाठी पावसाची गरज असताना आभाळ कोरडेच असल्याने शेतकर्!यांची चिंता वाढली आहे.

यंदा अलनिनोमुळे पावसावर मोठा परिणाम झाला आहे. तसा अंदाज हवामान विभागाने आधीच व्यक्त केला होता. मात्र, जुलै महिण्याच्या सुरवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकर्!यांसह सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. यामुळे पेरणीला वेग आला. साडेनऊ लाख हेक्टरपैकी जवळपास साडेसात लाख हेक्टरवरील पेरणी झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दोन लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या आहे. जूनअखेरीस झालेल्या दमदार पावसानंतर जिल्हाभर पेरण्यांना वेग आला. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात संततधार पावसाने जिल्ह्यातील नद्या, नाले आणि ओढे प्रवाहित झाले. अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. या अतिवृष्टीमुळे काही प्रमाणात शेतकर्!यांचे नुकसान झाले. पाऊस थांबताच शेतकर्!यांनी डवरणी, खतांचा पुरवठा आणि कीटकनाशक फवारणीची कामे आटोपली. त्यानंतर पुन्हा पाऊस झाल्यास पिकांची वाढ चांगली होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मागील दहा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने आता सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ढगाळ वातावरण तयार होत असले तरी दमदार पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पावसाचा खंड आणखी वाढल्यास रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दोन लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या

दरवर्षी १५ जुलैपर्यंत जवळपास शंभर टक्के पूर्ण होत होत्या. यंदा अजूनही दोन लाख हेक्टरवरील पेरण्या अद्यापपर्यंत झालेल्या नाही, याशिवाय निकृष्ट बियाण्यांची भर घातली आहे. सद्य:स्थितीत केवळ साडेसात लाख हेक्टरवर पेरणी झालेली आहे. यात चार लाख ४२ हजार हेक्टरवर कापूस, दोन लाख २० हजार हेक्टरवर सोयाबीन, ९३ हजार ३६० हेक्टरवर तूरीची पेरणी झाली आहे. याशिवाय ज्वारी, मूग, उडीद, तीळ या पिकांचा समावेश आहे. गेल्या दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने साडेसात लाख हेक्टरवरील पिक धोक्यात आले आहे. कोरडवाहू शेतातील पीक सध्या अडचणीत आले असून शेतकर्!यांचे लक्ष पावसाकडे लागले आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande