‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत अमृत तलाव परिसरात वृक्षारोपण
नांदेड, 20 जुलै (हिं.स.)। संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी यांच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत शिंपाळा रोड वरील अमृत तलावाच्या सभोवताली वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात सेवाश्रम वसतिगृहातील ९० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत
अ


नांदेड, 20 जुलै (हिं.स.)।

संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी यांच्या वतीने ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत शिंपाळा रोड वरील अमृत तलावाच्या सभोवताली वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात सेवाश्रम वसतिगृहातील ९० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध वृक्षांची लागवड केली. यावेळी संस्था प्रमुख आणि कार्यकर्ते यांनीही यात सहभाग घेतला.

मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी करण्यासाठी आणि भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या संतवचनाप्रमाणे वृक्ष हे आपल्या जीवनाचे अविभाज्य सोबती आहेत. आज लावलेले एक रोप भविष्यात अनेक जीवांना सावली, प्राणवायू आणि जीवन देणारे ठरू शकते. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी आज आपण केलेला प्रत्येक प्रयत्न हा पुढील पिढीसाठी जीवनदान आणि वरदान ठरू शकतो.

विद्यार्थ्यांनी अमृत तलावाच्या परिसरात वृक्षारोपण करून वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्प केला. आईप्रमाणेच वृक्षांचेही संगोपन आणि संवर्धन करण्याची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणारा हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande