बीडमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आंदोलन
बीड, 21 जुलै (हिं.स.)। नीट परीक्षेतील गोंधळाच्या विरोधात आयोजित सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बीड शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. महाराष्ट्र राज्य विव
आंदोलन


बीड, 21 जुलै (हिं.स.)। नीट परीक्षेतील गोंधळाच्या विरोधात आयोजित सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बीड शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

महाराष्ट्र राज्य विवेकवाहिनीच्या राज्य प्रमुख प्राचार्य डॉ. सविता शेटे आणि मअंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य कॉ. डी. जी. तांदळे यांच्या नेतृत्वाखाली विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. जंतरमंतर येथे शांततामय मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आंदोलकांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

यावेळी आंदोलकांनी “तानाशाही नहीं चलेगी”, “सोनम वांगचुक जिंदाबाद”, “शिक्षण आमच्या हक्काचे” यांसह विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला. शासनाने सोनम वांगचुक यांच्या शिक्षण व परीक्षा व्यवस्थेसंदर्भातील मागण्या तातडीने मान्य कराव्यात, तसेच त्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.

या आंदोलनात माजी आमदार उषा दराडे, कॉ. नामदेव चव्हाण, कॉ. भाऊराव प्रभाळे, प्राचार्य कॉ. राजकुमार कदम, प्रा. विजय घेवारे, विधिज्ञ करुणा टाकसाळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande