
लातूर, 21 जुलै, (हिं.स.)। जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक स्थळाची पाहणी केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७५ फुटी स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे.
याप्रसंगी भिक्खू पय्यानंद थेरो, लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी, गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, नगरसेवक आतिश चिकटे, सचिन गायकवाड, शहर अभियंता उषा काकडे, उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी नगरसेवक चंद्रकांत चिकटे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis