महापौर आडकेना माहेरची साडी देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता
नाशिक, 21 जुलै (हिं.स.)। एखादा लोकप्रतिनिधी केवळ पदामुळे मोठा होत नाही, तर सामान्यांच्या वेदना समजून घेऊन त्यावर न्याय्य निर्णय घेण्याची संवेदनशीलता त्याला खऱ्या अर्थाने लोकनेता बनवते. नाशिक महानगरपालिकेच्या महापौर . हिमगौरी आडके यांनी अंगणवाडी मुख
Anganwadi workers express


नाशिक, 21 जुलै (हिं.स.)। एखादा लोकप्रतिनिधी केवळ पदामुळे मोठा होत नाही, तर सामान्यांच्या वेदना समजून घेऊन त्यावर न्याय्य निर्णय घेण्याची संवेदनशीलता त्याला खऱ्या अर्थाने लोकनेता बनवते. नाशिक महानगरपालिकेच्या महापौर . हिमगौरी आडके यांनी अंगणवाडी मुख्य सेविका, सेविका आणि मदतनीस यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मानधनवाढीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महासभेत ठराव मंजूर करून शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला. या निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नाशिक महानगरपालिका अंगणवाडी कर्मचारी कामगार हितरक्षक सभेच्या वतीने महापौरांचा माहेरची साडी देऊन करण्यात आलेला सत्कार हा केवळ एक औपचारिक सन्मान नव्हता, तर तो एका भगिणींनी आपल्या माहेरच्या भगिणीबद्दल व्यक्त केलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जिव्हाळ्याचा भावनिक आविष्कार होता.

या आनंदाच्या भावनेतून महापौर निवासस्थानी जाऊन कामगार हितरक्षक सभेच्या वतीने सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी माहेरची साडी देऊन महापौरांचा भावपूर्ण सत्कार केला. महाराष्ट्राच्या संस्कृतीत माहेरची साडी ही केवळ वस्त्र नसून ती मायेची ऊब, विश्वास, सन्मान आणि जिव्हाळ्याचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे हा सन्मान महापौरांच्या निर्णयाबद्दल व्यक्त करण्यात आलेल्या मनःपूर्वक कृतज्ञतेचा अविस्मरणीय क्षण ठरला.

यावेळी चैताली भालेराव, अनिता जाधव, लिला शेवाळे, सुनंदा धनगर, मंदा येलमामे, भारती ठोके, रंजना पिठे, मिना सानप, स्वाती बोडके, कल्पना देशमुख, सरला लांडगे, मनीषा वाघमारे, शालिनी भालेराव, सरला देसले, सुमन दुसिंग, शिला पवार, फिरोजा शेख, सुनिता काळशेकर, मोमिना शेख, संगीता कुंभकर्ण, रत्ना शेंगदाणे, सुरेखा राजहंस, कल्पना आहेर, उषा आहिरे, दरगोडे यांच्यासह अनेक अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande