
शहरालगतच्या 16 गावांचा कचरा देखील उचलण्यात येणार
नाशिक, 21 जुलै (हिं.स.)। नाशिक महानगरपालिका अजून एक नवीन स्वतंत्र कचरा डेपोचा प्रकल्प तयार करणार असून आता कचऱ्यापासून सीएनजी गॅस तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी महापौरांनी शेतकऱ्यांना होणाऱ्या पाण्याच्या त्रासापासून मुक्तता देण्यासाठी नवीन प्रकल्पाच्या कामाचा भूमिपूजन केल्याचे देखील यावेळी सांगितले.
नाशिक शहरालगत असलेल्या कचरा डेपोतील कचऱ्यापासून निघणाऱ्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर असल्यामुळे या परिसरातील शेतकरी तसेच नागरिकांनी महापालिका प्रशासनाबरोबरच काही दिवसांपूर्वी महापौर उपमहापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलेले होते पदाधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केल्यानंतर एसटीपी प्लॅनमध्ये हे पाणी घेऊन जाण्याचा स्वतंत्र प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला होता त्या निर्णयानुसार या प्रकल्पाला येणारा अडीच कोटी रुपयांचा खर्च देखील मंजूर केला असल्याचे सांगून महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे , स्थायी समिती सभापती मछिंद्र सानप, व इतर भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.अधिक माहिती देताना महापौर हिमगौरी आहेर-आडकेनी सांगितले की नाशिक शहरालगत असलेल्या 16 गावांचा कचरा हा नाशिक महानगरपालिकेच्या कचरा डेपो मध्ये आणावा याबाबत जिल्हा प्रशासनाने दिलेल्या पत्राचा विचार करून लवकरच कचरा डेपोच्या शेजारील जागा देखील विस्तारीकरणासाठी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसापासून तंत्रज्ञानामध्ये झालेला बदल लक्षात घेता नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान देखील घेण्यात येणार आहे. तसेच शहरामध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कचरा विलगीकरणांमध्ये देखील या नवीन प्रकल्पाचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV