
छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताहअंतर्गत भाजपा महिला मोर्चाने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या संदेशाला प्रतिसाद देत रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
यावेळी भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा उज्वलाताई दहिफळे, सरचिटणीस तथा नगरसेविका छायाताई खाजेकर यांच्यासह महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्तदानाच्या या महायज्ञातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे, हीच भावना व्यक्त करत उपस्थितांनी समाजसेवेचा संकल्प अधिक दृढ केला.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis