परभणी - जंतरमंतर येथील आंदोलकांवरील लाठीचार्ज व दडपशाहीचा निषेध
परभणी, 21 जुलै (हिं.स.)। नीट-यूजीपरीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर करण्यात येत असलेल्या आंदोलनाला दडपण्यासाठी सरकारने आंदेलकांवर सोमवारी(दि. २०)केलेल्
जंतरमंतर येथील आंदोलकांवरील लाठीचार्ज व दडपशाहीचा निषेध -गंगाखेड काँग्रेस कमिटीचे राष्ट्रपतींना निवेदन


परभणी, 21 जुलै (हिं.स.)। नीट-यूजीपरीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर करण्यात येत असलेल्या आंदोलनाला दडपण्यासाठी सरकारने आंदेलकांवर सोमवारी(दि. २०)केलेल्या लाठीहल्ल्याचा गंगाखेड काँग्रेस कमिटीने गंगाखेड शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात निषेध करण्यात आला असून याविषयी विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठविण्यात आले आहे.

या निवेदनात, राष्ट्रीय परीक्षांचे पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, नीट-यूजी परिक्षा रद्द होण्यामागील तसेच सर्व पेपरफुटी व अनियमिततांची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर जबाबदारी निश्चित करावी तसेच राष्ट्रीय परिक्षा एजेंसी कायमची रद्द करून पर्यायी व्यवस्था निर्माण करावी, आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्याच्या कुटुंबास सानुग्रह मदत द्यावी, जंतरमंतर व इतरत्र शांततामय आंदोलनाचा अधिकार पूर्ववत करावा आणि शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी आंदोलकांशी प संवाद साधावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.निवेदनावर गंगाखेड तालुका कॉग्रेस कमीटीचे अध्यक्ष रमेश पवार, ॲड. लक्ष्मण केंद्रे, भाई गोपीनाथ भोसले, सुरेश इखे, सुनील पौळ, युवक काँग्रेसचे शेख अज्जू, कॉ. ओंकार पवार, कॉ. योगेश फड, अमानुल्ला खान, डॉ. शैलेश कदम, रोहिदास लांडगे, अंकुश कांबळे, सुभाष शिंदे, इक्बाल चाऊस, नामदेव साठे, ॲड अदित्य शिरसाट, वसंत गेजगे, वामन ढोबळे, अनिल चौरे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande