नांदेड - रानभाजी महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन
नांदेड, 21 जुलै (हिं.स.)। प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवट यांच्या कार्यक्षेत्रात संपूर्ण नांदेड जिल्ह्याचा समावेश असून जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थी तसेच सर्व अनुसूचित जमातीच्या महिला बचत गटांनी आदिवासी व
नांदेड - रानभाजी महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन


नांदेड, 21 जुलै (हिं.स.)।

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवट यांच्या कार्यक्षेत्रात संपूर्ण नांदेड जिल्ह्याचा समावेश असून जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थी तसेच सर्व अनुसूचित जमातीच्या महिला बचत गटांनी आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या रानभाजी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत रानभाजी विक्रीचे काम करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी स्थानिक परिसरात उपलब्ध रानभाज्यांचे जिल्हास्तरावर प्रदर्शन व विक्री करण्यासाठी जुलै ते सप्टेंबर 2026 या कालावधीत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात सहभागी लाभार्थ्यांना प्रकल्प कार्यालयामार्फत स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

याशिवाय लाभार्थ्यांना आवश्यकतेनुसार वजनकाटा, पाटी, टोपली, कॅरेट, छत्री, स्टॉल आदी साहित्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे हंगामी रानभाजी विक्रीचे काम करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या परिसरातील रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रानभाजी महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी 20 ते 27 जुलै 2026 या कालावधीत कार्यालयीन वेळेत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवट, जि. नांदेड येथील सेतुसुविधा केंद्रात नोंदणी करावी.

आदिवासी विकास विभागाच्या या उपक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्री. बी. सरवनन यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande