
छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने आयोजीत राष्ट्रीय लोकअदालत मध्ये प्रलंबित व वादपूर्व असे एकूण १२ कोटी ३६ लक्ष ९५ हजार ९५६ रुपये रकमेची ९२६ कलम १३८ एन.आय. ॲक्टची प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वै.बा.गुळवे पाटील यांनी कळविले आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गिरीश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली प्रलंबित व वादपूर्व प्रकरणांच्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. त्यात विविध शासकीय विभाग, वीज कंपनी, विधीज्ञ, सरकारी वकील, वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी इ. सहभाग घेतला. त्यात ९२६ प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड झाली. त्यात प्रलंबित प्रकरणांमध्ये १२ कोटी ३६ लक्ष ९५ हजार ९५६ रुपये रक्कम वसुली झाली. राष्ट्रीय लोकअदालतीसाठी जिल्ह्यात पॅनल तयार करण्यात आले होते, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वै.बा.गुळवे पाटील यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis