डोंबिवलीच्या वाहतुकीला दिलासा; रिक्षा संघटना व वाहतूक पोलिसांची संयुक्त बैठक
डोंबिवली, 21 जुलै (हिं.स.)।शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी डोंबिवली वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ अधिकारी विजय अहिरे यांच्या उपस्थितीत सर्व रिक्षा संघटनांची संयुक्त बैठक पार पडली. शहरातील पूर्व-पश्चिम भागातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध आणि सुर
Ph01


डोंबिवली, 21 जुलै (हिं.स.)।शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी डोंबिवली वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ अधिकारी विजय अहिरे यांच्या उपस्थितीत सर्व रिक्षा संघटनांची संयुक्त बैठक पार पडली. शहरातील पूर्व-पश्चिम भागातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीने या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयांवर सकारात्मक चर्चा झाली.

बैठकीत डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागातील वाहतूक सुरळीत करण्यावर विशेष भर देण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच रिक्षा स्थानकांवर प्रवासी आणि वाहनांची योग्य रांग लागावी यासाठी महापालिकेमार्फत रेलिंग उभारण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. याशिवाय सकाळी व सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पीक अवर्समध्ये महत्त्वाच्या चौकांवर अतिरिक्त वाहतूक कर्मचारी तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी विजय अहिरे यांनी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींना आश्वस्त करत, मी रोडवर काम करणारा अधिकारी आहे. मला येथे येऊन आठ दिवस झाले आहेत. तुम्ही चिंता करू नका, मी पूर्ण सहकार्य करेन, असे स्पष्ट शब्दांत सांगितले.

प्रशासनाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल सर्व रिक्षा संघटनांनी समाधान व्यक्त केले. डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष (वाहतूक सेल, कल्याण भाजपा) दत्ता माळेकर.यांनी या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाचे सकारात्मक पाऊल मानली जात असून, नागरिकांच्या अपेक्षा आता या निर्णयांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे लागल्या आहेत.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande