
नवी दिल्ली, 21 जुलै (हिं.स.)भारत आणि महाराष्ट्राचा फलंदाज ऋतुराज गायकवाडची २३ ऑगस्टपासून बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये होणाऱ्या दुलीप ट्रॉफीसाठी पश्चिम विभागाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली असून, शमश मुलानी उपकर्णधार असेल.
मुंबईचे मुख्य निवडकर्ता राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. २३ ते २६ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात पश्चिम विभागाचा सामना उत्तर विभागाशी होईल. दुलीप ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यासह एकूण पाच सामने खेळले जातील, जो ६ ते १० सप्टेंबर दरम्यान खेळला जाईल.
गेल्या वर्षी मुंबई सोडून महाराष्ट्रकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉचाही पश्चिम विभागाच्या संघात समावेश आहे. सरफराज खान आणि मुशीर खान यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. शॉला गेल्या काही वर्षांपासून आपला फॉर्म परत मिळवता आलेला नाही. यामुळे त्याला मोठ्या खेळीसह फॉर्ममध्ये परतण्याची संधी मिळेल.
दुलीप ट्रॉफीसाठी पश्चिम विभागाचा संघ
ऋतुराज गायकवाड (कर्णधार, महाराष्ट्र), शम्स मुलानी (उपकर्णधार, मुंबई), पृथ्वी शॉ (महाराष्ट्र), हार्विक देसाई (यष्टीरक्षक, सौराष्ट्र), उर्विल पटेल (यष्टीरक्षक, गुजरात), शिवालिक शर्मा (वडोदरा), मुशीर खान (मुंबई), सर्फराज खान (मुंबई), सर्फराज खान (मुंबई), मुशीर खान (मुंबई) देसाई (गुजरात), तनुष कोटियन (मुंबई), तुषार देशपांडे (मुंबई), शार्दुल ठाकूर (मुंबई), अतित सेठ (वडोदरा), मुकेश चौधरी (महाराष्ट्र).
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे