भारत विरुद्ध झिम्बाब्वे टी-२० मालिका रोमांचक होईल : सिकंदर रझा
हरारे, 21 जुलै (हिं.स.)भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका गुरुवारी सुरू होत आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने मालिकेपूर्व म्हटले आहे की, त्याच्या संघाला कमी लेखता येणार नाही आणि
झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा


हरारे, 21 जुलै (हिं.स.)भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका गुरुवारी सुरू होत आहे. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने मालिकेपूर्व म्हटले आहे की, त्याच्या संघाला कमी लेखता येणार नाही आणि या मालिकेत दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत.

इंग्लंडच्या निराशाजनक मर्यादित षटकांच्या दौऱ्यातून सावरण्याच्या उद्देशाने भारतीय संघ झिम्बाब्वेमध्ये दाखल झाला आहे. नवीन टी-२० कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताने बेलफास्टमध्ये आयर्लंडविरुद्धची मालिका ०-२ ने गमावली, त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत ०-४ असा पराभव पत्करला. इतकेच नाही, तर शुभमन गिलच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाने एकदिवसीय मालिकाही १-२ ने गमावली.

टी-२० क्रिकेटमधील भारताची प्रभावी कामगिरी असूनही, या सामन्यात विजेता निवडणे कठीण आहे, असे रझाला वाटते. १३६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या या अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटूने सांगितले की, आपल्या संघाच्या अलीकडील कामगिरीमुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. रा म्हणाला की, या मालिकेत दोन्ही देशांना समान संधी मिळेल. त्याने विश्वास व्यक्त केला की, झिम्बाब्वे सातत्याने चांगला आणि मनोरंजक क्रिकेट खेळत असल्यामुळे, ही मालिका प्रेक्षकांसाठी रोमांचक ठरेल.

रझाने मान्य केले की भारतीय संघ सध्या स्थित्यंतराच्या काळातून जात आहे, पण त्यान हेही निदर्शनास आणून दिले की झिम्बाब्वे संघही आपल्या संघाची पुनर्रचना करत आहे आणि संघात तरुण क्रिकेटपटूंचा समावेश करत आहे. त्यांनी स्पष्ट केले की ते या मालिकेला एकतर्फी मानत नाहीत. पण, भारतीय संघ २०२४ मधील झिम्बाब्वेच्या मागील दौऱ्यातून आत्मविश्वास मिळवेल, जेव्हा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली, पहिला सामना गमावल्यानंतर त्यांनी पुनरागमन करत पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ ने जिंकली होती. दोन्ही संघांचा स्वतःला सिद्ध करण्याचा निर्धार पाहता, रझा यांना एकतर्फी निकालाऐवजी एका मनोरंजक लढतीची अपेक्षा आहे.

फेब्रुवारीमध्ये कोलंबो येथे झालेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक सामन्यात झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला २३ धावांनी पराभूत केले. त्यांनी यावर्षी श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्धही विजय मिळवला आहे. रझा म्हणाले, जय-पराजयाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, ही मालिका जिंकण्याची दोन्ही संघांना समान संधी असेल. भारत सध्या स्थित्यंतराच्या टप्प्यातून जात आहे, ज्यामुळे ही मालिका आणखी रोमांचक बनते. मला वाटत नाही की ही मालिका एकतर्फी होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande