
छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै (हिं.स.)। गतिमान महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित देवाभाऊ कृतज्ञता सेवा सप्ताहअंतर्गत श्रेयस प्रतिष्ठानच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमास भेट देताना श्रेयस प्रतिष्ठानचे अध्यक्ष बसवराज मंगरुळे, विशाल थोरात यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या महारक्तदान शिबिरात महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. रक्तदात्यांचा गौरव म्हणून त्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान या संदेशाला प्रतिसाद देत अनेकांनी या महायज्ञात सहभाग नोंदवून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.
----------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis