महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची ६३ वी बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची ६३ वी बैठक मंत्रालयात संपन्न झाली. अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे त्या
अ


छत्रपती संभाजीनगर, 21 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची ६३ वी बैठक मंत्रालयात संपन्न झाली. अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यांग लाभार्थ्यांच्या विविध धोरणात्मक निर्णयांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणासाठी व त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना अधिक प्रभावीपणे राबवल्या जाव्यात, यासाठी आवश्यक सूचना दिल्या. यावेळी दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव माणिकराव गुरसाळ, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश थविल, दिव्यांग राष्ट्रीय महामंडळाचे संचालक अनिल कुमार उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande