मोर्शी तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीवर पान-गुटख्याचे डाग
अमरावती, 21 जुलै (हिं.स.)। महसूल व वन विभागामार्फत लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या मोर्शी तालुका प्रशासकीय इमारतीची अवघ्या चार महिन्यांतच दुरवस्था झाल्याचे समोर आले आहे. नव्या तहसील कार्यालयाच्या भिंतींवर पान, गुटखा आणि तंबाखूच्या थुंकीचे डा
लाखो खर्चाच्या नव्या मोर्शी तहसील इमारतीवर गुटखा-पानाच्या डागांचे विद्रूप चित्र


अमरावती, 21 जुलै (हिं.स.)। महसूल व वन विभागामार्फत लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या मोर्शी तालुका प्रशासकीय इमारतीची अवघ्या चार महिन्यांतच दुरवस्था झाल्याचे समोर आले आहे. नव्या तहसील कार्यालयाच्या भिंतींवर पान, गुटखा आणि तंबाखूच्या थुंकीचे डाग दिसून येत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण 7 मार्च 2026 रोजी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, अल्पावधीतच सरकारी कार्यालयाच्या भिंती विद्रूप झाल्याने स्वच्छता आणि सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

राज्यात गुटखा आणि तंबाखू विक्री तसेच सेवनावर बंदी असतानाही सरकारी कार्यालय परिसरातच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्वच्छता, शिस्त आणि जबाबदारीचा संदेश देणाऱ्या प्रशासकीय इमारतीची अशी अवस्था होणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

नागरिकांनी संबंधित विभागाकडे कार्यालय परिसरात गुटखा व तंबाखू सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सीसीटीव्हीच्या माध्यमातून दोषींची ओळख पटवून दंडात्मक कारवाई करावी आणि इमारत तातडीने स्वच्छ करून तिचे सौंदर्य कायम राखावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande