
जळगाव, 21 जुलै (हिं.स.) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर, जि. जळगाव या कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी दि. १ ऑगस्ट २०२६ ते दि. १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत एकूण ३ महिने १५ दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण सत्राच्या प्रवेशाची अंतिम मुदत दि. १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
प्रवेशासाठी उमेदवाराने www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी उमेदवार हा अनुसूचित जमातीचा, महाराष्ट्राचा रहिवासी, शालांत परीक्षा (१० वी) उत्तीर्ण असवा व त्याचे वय १८ वर्षे पूर्ण असावे.प्रशिक्षणामध्ये विविध शासकीय व निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करून घेतली जाते. प्रशिक्षण काळात उपस्थितीनुसार प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा रु. १,००० विद्यावेतन देण्यात येते. तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ४ पुस्तकांचा मोफत संच व प्रमाणपत्र देण्यात येते. प्रशिक्षणामध्ये प्रवेश मिळविण्याकरिता २७ जुलै रोजी १० वाजता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला, १० वी, १२ वी व पदवी (सर्व शैक्षणिक पात्रता) गुणपत्रिका, आधार कार्ड, बँक पासबुक, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो तसेच अनुसूचित जमातीचा जातीचा दाखला यांच्या मूळ व झेरॉक्स प्रतींसह उपस्थित राहावे. प्रशिक्षणाच्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागेल.अधिक माहितीसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट क्र. २, शनि मंदिरामागे, स्टेशन रोड, पंचायत समिती जवळ, रावेर येथे किंवा दूरध्वनी क्र. ०२५८४-२५१९०६ वर संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर