नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह घेणार भारत आणि चीनच्या राजदूतांची भेट
काठमांडू, 23 जुलै (हिं.स.)।नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारत आणि चीन यांच्याशी संबंधांमध्ये संतुलन राखण्याच्या उद्देशाने काठमांडूमधील परदेशी राजदूतांशी स्वतंत्र भेटी न घेण्याचा स्वतःचाच नियम मोडण्याच्या तयारीत आहेत. या आठवड्यात शाह भारताचे राजदूत नव
नेपाळचे बालेन शाह यांची एकाच दिवशी भारत आणि चीनच्या राजदूतांची भेट घेण्याची घोषणा


काठमांडू, 23 जुलै (हिं.स.)।नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारत आणि चीन यांच्याशी संबंधांमध्ये संतुलन राखण्याच्या उद्देशाने काठमांडूमधील परदेशी राजदूतांशी स्वतंत्र भेटी न घेण्याचा स्वतःचाच नियम मोडण्याच्या तयारीत आहेत. या आठवड्यात शाह भारताचे राजदूत नवीन श्रीवास्तव आणि चीनचे राजदूत झांग माओमिंग यांची स्वतंत्रपणे भेट घेणार असल्याचे वृत्त आहे.

नेपाळ माध्यमांच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळकडून नवी दिल्ली आणि बीजिंग या दोन्ही देशांना समान महत्त्व दिले जाते, हा संदेश देण्यासाठी शाह एकााच दिवशी भारतीय आणि चिनी राजदूतांची स्वतंत्र भेट घेणार आहेत. या बैठकींच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नसल्या तरी नेपाळ सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

बालेन शाह सरकारच्या पहिल्या १०० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जनरेशन-झेड (जेन-जी) च्या आंदोलनानंतर सत्तेवर आल्यानंतर शाह यांनी दीर्घकाळापासून चालत आलेल्या राजनैतिक परंपरेपासून वेगळी भूमिका घेत परदेशी राजदूतांशी स्वतंत्र भेटी घेण्यास नकार दिला होता. त्याऐवजी त्यांनी काठमांडूमध्ये नियुक्त राजदूतांसोबत दोन वेळा संयुक्त राजनैतिक बैठका घेतल्या होत्या.

परंपरेनुसार, नव्याने निवडून आलेले पंतप्रधान पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच पंतप्रधान कार्यालयात किंवा अधिकृत निवासस्थानी परदेशी राजदूतांची स्वतंत्र भेट घेतात. मात्र शाह यांनी ही पद्धत अवलंबली नव्हती. तथापि, जुलैच्या सुरुवातीला नेपाळच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट घेऊन शाह यांनी या भूमिकेला अपवाद केला होता.

काठमांडूमधील माध्यमांच्या वृत्तानुसार, शाह यांनी अलीकडे व्यापारी, कंत्राटदार, उद्योगपती आणि निर्यातदार यांच्यासह व्यावसायिक समुदायाशी नियमित संवाद साधण्यासही सुरुवात केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande