न्यूयॉर्कमध्ये ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत ज्यू व्यक्तीवर हल्ला; दोघे जखमी
अल्बानी, 24 जुलै (हिं.स.)।अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत एका हल्लेखोराने ज्यू धर्मीय व्यक्तीवर स्क्रूड्रायव्हरने हल्ला केला, तर दुसऱ्या एका व्यक्तीवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. ज्यूविरोधी भावना वाढत असलेल्या पार्श्व
न्यूयॉर्कमध्ये ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत ज्यू व्यक्तीवर हल्ला; दोघे जखमी


अल्बानी, 24 जुलै (हिं.स.)।अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत एका हल्लेखोराने ज्यू धर्मीय व्यक्तीवर स्क्रूड्रायव्हरने हल्ला केला, तर दुसऱ्या एका व्यक्तीवर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. ज्यूविरोधी भावना वाढत असलेल्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशे येझहाक ग्रुनहास हे गुरुवारी दुपारी ज्यू प्रार्थनासभेतून बाहेर पडून घरी परतत असताना त्यांच्यावर स्क्रूड्रायव्हरने हल्ला करण्यात आला. दुसऱ्या पीडिताची ओळख चोक सुंग अशी असून ते पूर्व आशियाई वंशाचे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्यावर जवळच चाकूने हल्ला करण्यात आला.

न्यूयॉर्क पोलिस आयुक्त जेसिका टिश यांनी हल्लेखोराची ओळख ५१ वर्षीय राउल मोरालेस अशी असल्याचे सांगितले. हा द्वेषातून प्रेरित गुन्हा (हेट क्राइम) आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. टिश यांनी सांगितले की, पीडित आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, मोरालेसने दोन्ही हल्ल्यांदरम्यान ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा दिल्या होत्या. दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्यू समुदायाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या ‘मॅनहॅटन शोमरिम’ या गटाने संशयिताची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनीही हल्लेखोराने दोन्ही घटनांवेळी ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा दिल्याचे मान्य केले. मात्र, प्राथमिक पोलिस तपासानुसार संशयिताच्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या या घटनेमागील एक कारण असू शकते, असे त्यांनी म्हटले. “आपल्या शहरात अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण आणि घृणास्पद हल्ल्यांना कोणतेही स्थान नाही,” असे ममदानी यांनी स्पष्ट केले.

सिटी कौन्सिलच्या अध्यक्षा जुली मेनिन यांनी सांगितले की, ज्यू समुदायामध्ये भीतीचे वातावरण वास्तव आहे. “प्रत्येक न्यूयॉर्ककराला, त्याचा धर्म किंवा ओळख काहीही असो, आपल्या परिसरात सुरक्षित वाटण्याचा अधिकार आहे,” असे त्या म्हणाल्या. दरम्यान, एका ज्यू संघटनेने या घटनेसह ज्यू समुदायावरील इतर हल्ल्यांचा संबंध इस्रायलविरोधात ममदानी यांनी पूर्वी केलेल्या वक्तव्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande