आधी सीमापार दहशतवाद थांबवा, मगच चर्चा ; भारताचा पाकिस्तानला कडक इशारा
नवी दिल्ली , 03 जुलै (हिं.स.)।पाकिस्तानकडून सातत्याने उपस्थित केला जात असलेल्या सिंधू जल कराराच्या मुद्द्यावर भारत सरकारने ठाम भूमिका मांडत कडक प्रत्युत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पाकिस्तानला स्पष्ट इशारा देत म्हटले की, सिंधू जल क
आधी सीमापार दहशतवाद थांबवा, मगच चर्चा ; पाकिस्तानला भारताचा कडक इशारा


नवी दिल्ली , 03 जुलै (हिं.स.)।पाकिस्तानकडून सातत्याने उपस्थित केला जात असलेल्या सिंधू जल कराराच्या मुद्द्यावर भारत सरकारने ठाम भूमिका मांडत कडक प्रत्युत्तर दिले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पाकिस्तानला स्पष्ट इशारा देत म्हटले की, सिंधू जल कराराबाबत कोणतीही पुढील चर्चा हवी असेल, तर पाकिस्तानने सीमापार दहशतवादाला दिला जाणारा पाठिंबा कायमस्वरूपी आणि विश्वासार्हपणे बंद करणे आवश्यक आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, सिंधू जल कराराबाबत भारताची भूमिका पूर्वीप्रमाणेच कायम आहे. पाकिस्तानकडून सातत्याने सीमापार दहशतवादाला पाठिंबा दिला जात असल्यामुळे हा करार सध्या स्थगित ठेवण्यात आला आहे. पाकिस्तानला या कराराबाबत पुढील चर्चा अपेक्षित असेल, तर त्याने सीमापार दहशतवादाला दिलेला पाठिंबा पूर्णपणे आणि कायमचा थांबवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande